तुम्ही खूप छान भाषण करता, निवडणूक लढवणार का? PM मोदी जेव्हा महिलेला थेट ऑफर देतात

| Updated on: Dec 18, 2023 | 3:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. ते विकासशील भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या लोकांची भेट घेत आहेत. यादरम्यान त्यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला. यावेळी भाषण करताना महिलेला पाहून मोदी खूपच प्रभावित झाले आणि त्यांनी थेट निवडणूक लढवण्यासाठी ऑफर केली.

तुम्ही खूप छान भाषण करता, निवडणूक लढवणार का? PM मोदी जेव्हा महिलेला थेट ऑफर देतात
modi
Follow us on

PM Modi Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. यावेळी वाराणसीतील उमराहा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्वरवेद महामंदिराचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. यावेळी विकासशील भारत संकल्प यात्रेअंतर्गत क्रीडा स्पर्धेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. या दरम्यान त्यांनी गावातील महिलांशीही संवाद साधला.

महिलेला निवडणूक लढवण्याची ऑफर

बचत गटातील महिलांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिलेचे खूप कौतुक केले. कार्यक्रमात चंदादेवी नावाची महिला भाषण करत होती, तेव्हा पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही खूप चांगले भाषण देता, तुम्ही कधी निवडणूक लढवणार नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलेला थेट निवडणूक लढवण्याची ऑफरही दिली, ज्यावर महिलेने सांगितले की, आम्ही निवडणुकीचा विचार करत नाही आणि आम्ही हे सर्व तुमच्याकडूनच शिकलो आहे. आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत आणि तुमच्यासमोर बोलत आहोत, ही अभिमानाची बाब असल्याचे महिलेने म्हटले.

कार्यक्रमाला संबोधित करणारी महिला लखपती महिला कार्यक्रमाशी संबंधित आहे. वास्तविक, या कार्यक्रमांतर्गत राज्यातील योगी सरकार तीन वर्षांत प्रत्येक सहभागी महिलेला करोडपती बनवण्याचा प्रयत्न करत आहे.