मुंबईः सैन्यात भरती होण्यासाठी धावणारा प्रदीप (Pradip) तुम्हाला आठवत असेलच. दिवसभर काम करायचा आणि रात्री दहा किलोमीटर धावत घरी जाणारा प्रदीप प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचा किस्साही भारीच होता. सैन्यात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करण्याच्या उद्देशानं तो धावत (Running) होता. पण आता आणखी एक चकीत करणारा एका प्रकार समोर आला आहे. हा प्रकार चकीत करणारा असला तरिही तितकाच वाखाण्याजोगा आणि कौतुकास्पदही आहे. सैन्यात भरती (Indian Army) नाही झाली म्हणून एकानं चक्क 350 किलोमीटर अंतर हे धावून पार केलं आहे. अवघ्या 50 तासांत सैन्य भरतीत निवड न झालेल्या या तरुणानं हे अंतर कापलं आहे. हा मुलगा आहे राजस्थानचा. सैन्यात भरती होण्यासाठी आला. सैन्य भरतीत यश आलं नाही म्हणून चक्क धावत सुटला. धावून 350 किलोमीटर अंतर अवघ्या 50 तासात पूरं करण्याची किमया या तरुणानं करुन दाखवली आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मेरी उम्र 24 साल है। मैं नागौर ज़िले(राजस्थान) से आया हूं। भारतीय सेना में शामिल होने के लिए मेरे अंदर जुनून है। 2 सालों से भर्ती नहीं हो रही है। नागौर, सीकर, झुनझुनु के युवाओं की उम्र निकल रही हैं। मैं दौड़कर दिल्ली में युवाओं का जोश बढ़ाने के लिए आया हूं: सुरेश भिंचर pic.twitter.com/26QYaOXrkI
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2022
एखादी गोष्ट साध्य करता आली नाही, तर लोकं निराश होतात. वेगवेगळ्या गोष्टी करतात. काही खचूनही जातात. पण या तरुणानं चक्क धावत जात 350 अंतर कापण्याची किमया का करुन दाखवली, असा प्रश्नही अनेकांना पडलाय. या तरुणाचं नाव सुरेश भिंचर आहे. सुरेश 24 वर्षांचा आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील या तरुणाला भारतीय सैन्यात सामील व्हायचं होतं. गेल्या दोन वर्षांपासून तो त्यासाठी प्रयत्न करत होता.
#WATCH दिल्ली: भारतीय सेना में शामिल होने के लिए इच्छुक एक युवा राजस्थान के सीकर से दिल्ली में एक प्रदर्शन में शामिल होने के लिए 50 घंटे में 350 किलोमीटर दौड़कर पहुंचा। pic.twitter.com/rpRVH8k4SI
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2022
मग धावला कशासाठी?
आपलं सिलेक्शन झालं म्हणून सुरेश धावत सुटला. सलग धावला. त्याच्या धावणं निरर्थक निश्चितच नव्हतं. आता तो नेमका धावला का, हे जाणून घेणंही महत्त्वाचंय.
सुरेशनं आपल्या धावण्याचं कारणही स्पष्ट केलं आहे. आपल्या धावत जाण्यामागे एक संदेश त्याला द्यायचाय. हा संदेशही फार खास आहे. सुरेश सारखे अनेक जण सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक आहेत. पण अनेक जण सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक आहेत. भरती प्रक्रिया कधी सुरु होणार, याची वाट पाहत आहेत. पण अनेकांच वय हातातून निघून चाललंय. ही भरती निघावी म्हणून दिल्लीत निदर्शनं करण्यात आली होती. या निदर्शनांत सुरेशनं केलेलं अनोखं निदर्शन हे या तरुणांची उमेद वाढवण्यासाठी केलेला एक महत्त्वाचा प्रयत्न होता. मुलांचं मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी सुरेशची धाव ही अत्यंत महत्त्वाची होती. म्हणून प्रदीपच्या धावण्यानंतर सुरेशची धावही तितकीच अर्थपूर्ण आणि वाखाण्याजोगी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
संबंधित बातम्या
मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुणे मनसेत अंतर्गत वाद! वसंत मोरे नाराज, मनसे मात्र भूमिकेवर ठाम