Zomato डिलिव्हरी गर्ल पाहून लोकांना बसला धक्का, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

| Updated on: Oct 17, 2023 | 5:11 PM

Zomato Girl viral video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. रस्त्यावर एक तरुणी झोमॅटो डिलिव्हरी गर्ल म्हणून पोज देताना दिसते आहे. या तरुणीचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, कंपनीच्या सीईओला त्यावर पोस्ट करावी लागली.

Zomato डिलिव्हरी गर्ल पाहून लोकांना बसला धक्का, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
Follow us on

Zomato Girl : तुम्ही जेव्हाही झोमॅटो किंवा स्विगीवरुन काहीही मागवता तेव्हा एखादा पुरुष ती ऑर्डर घेऊन तुमच्या घरी आला असेल. पण झोमॅटो बॉयच्या ऐवजी तुमच्या घरी ऑर्डर घेऊन झोमॅटो गर्ल आली तर. तुम्हालाही ऐकून नव्वल वाटले असेल ना. पण सध्या एका झोमॅटो गर्लची सोशल मीडियावर चर्चा आहे. ही झोमॅटो गर्ल इंदूरच्या रस्त्यांवर लोकांना पाहायला मिळाली. एक सुंदर मुलगी झोमॅटोची बॅग घेऊन जाताना बाईकवर लोकांनी पाहिली आणि त्यांचे ही डोळे उंचावले. ट्रॅफिक सिग्नलवर लोकांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा अनेक जण कौतूकाने तिच्याकडे पाहत होते. काही जण याला प्रमोशनला अॅक्टिव्हीटी असल्याचं म्हणत आहेत. यावर आता झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी खुलासा केला आहे.

दीपंदर गोयल म्हणाले की, कंपनीचा या मॉडेलशी काहीही संबंध नाही. त्यांच्याकडे इंदूरमध्ये मार्केटिंग हेडही नाही. झोमॅटो हेल्मेटशिवाय दुचाकी चालविण्यास प्रोत्साहन देत नाही. कोणीतरी आमच्या ब्रँडच्या नावाने फ्री राईड देत आहे असे वाटते. एखादी महिला हे काम करत असेल तर त्यात काहीही चुकीचे नाही. आमच्या टीममध्ये शेकडो महिला आहेत ज्या दररोज अन्न वितरित करतात. त्यांचा आम्हाला अभिमान आहे.

Zomato नुसार ही महिला फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मशी अजिबात संबंधित नाही असे दिसून आले. 16 ऑक्टोबर 2023 रोजी पोस्ट केल्यापासून, क्लिपला आतापर्यंत 1.6 दशलक्ष व्ह्यू मिळाले आहेत.