Sindhudurg Postarbaji: सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिंकल्यानंतर राणे समर्थकांकडून पोस्टरबाजी सुरुच

| Updated on: Jan 05, 2022 | 12:03 AM

राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागितला. तसंच पुढील सुनावणी होईपर्यंत नितेश राणेंना अटक करणार नाही, असंही सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं.

Sindhudurg Postarbaji: सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिंकल्यानंतर राणे समर्थकांकडून पोस्टरबाजी सुरुच
NARAYAN RANE CARTOON
Follow us on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिंकल्यानंतर, राणे समर्थकांकडून सुरु झालेली पोस्टरबाजी काही थांबताना दिसत नाही. रत्नागिरीत राणे समर्थकांकडून पुन्हा एकदा पोस्टर लावण्यात आले आहेत. ”शेर अकेलाही आता है…माईंड इट”, असा असा मजकूर छापून, राणे समर्थकांनी शिवसेनेला डिवचण्याचं काम केलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर नारायण राणेंसह निलेश आणि नितेश राणेंचेही फोटो लावण्यात आले आहेत. यात नितेश राणे गुलालानं रंगलेले दाखवण्यात आले आहेत.

पोस्टर लावल्याने कोण वाघ होत नाही : वैभव नाईक

राणे कुटुंबीय आणि नितेश राणे यांनी पोस्टरबाजी केली. ते एका गुन्ह्यात आरोपी आहेत, त्यांनी पोस्टरबाजी न करता पोलिसांना तपासासाठी सहकार्य केले पाहिजे. पोलिसांसमोर आले पाहिजे. हे न करता पोस्टरबाजी करत आहेत. पोस्टर लावण्याचा अधिकार सर्वांना आहे. पोस्टरमध्ये लिहिले काय आणि वस्तुस्थिती काय हे सर्वांना माहिती आहे. आपल्यावर आरोप झाल्यानंतर कोण फिरत होतं आणि कोण लपलं होतं हे जनतेला माहिती आहे. कोण लपून बसलं आहे हे माहिती आहे. पोस्टर लावल्याने कोण वाघ होत नाही, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

राणे समर्थकांनी रत्नागिरीत हेच एक पोस्टर लावलं असं नाही. तर जिल्हा बँकेचा निकाल लागल्यापासून सोशल मीडियातील पोस्टही सुरुच आहेत. नितेश राणेंनीच, गाडलाच या शीर्षकाखाली एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर नारायण राणेंचंही पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झालं. राणेंच्या हातात वाघाच्या शेपूट असून, त्या वाघाला राणेंनी जिल्हा बँकेत जाण्यापासून रोखलं, असं दाखवण्यात आलं.

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंची हायकोर्टात धाव

दुसरीकडे संतोष परब हल्ला प्रकरणात, नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे. राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागितला. तसंच पुढील सुनावणी होईपर्यंत नितेश राणेंना अटक करणार नाही, असंही सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं. हायकोर्टात पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. पण सध्या तरी नितेश राणे समोर आलेले नाहीत. याबाबत नितेश राणेंनी पोलिसांसमोर यायला पाहिजे, नारायण राणेंनी त्यांना लपवून ठेवलं आहे. असं शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय. आता शुक्रवारी कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळं नितेश राणेंचं काय होणार हे 2 दिवसांत स्पष्ट होईल. (After winning Sindhudurg District Bank, poster campaign by Rane supporters continued)

इतर बातम्या

कोरोनावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण; भारती पवारांची राज्य सरकारवर टीका, तर कोरोना केंद्राला घाबरतो का? मलिकांचा सवाल

Maharashtra Lockdown again? | निर्बंध, लॉकडाऊन की आणखी काही? पुढचे काही तास महत्त्वाचे!