Chandrakant patil : हिंदू व्होट बॅंकेवरुन चंद्रकांत पाटील हे काय बोलले? पाटलांच्या त्या वक्तव्यावर टीकेची झोड

| Updated on: Dec 15, 2021 | 9:53 PM

व्होट बँकेच्या राजकारणात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांना आणलंय. त्यामुळं चंद्रकांत पाटील शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या निशाण्यावर आलेत. शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होट बँक तयार केली. त्यावर अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Chandrakant patil : हिंदू व्होट बॅंकेवरुन चंद्रकांत पाटील हे काय बोलले? पाटलांच्या त्या वक्तव्यावर टीकेची झोड
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us on

व्होट बँकेच्या राजकारणात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांना आणलंय. त्यामुळं चंद्रकांत पाटील शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या निशाण्यावर आलेत. शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होट बँक तयार केली. त्यावर अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. याआधीही व्होट बँकेच्या राजकारणावरून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कित्येकदा वाद झालेत, मात्र यावेळी चंद्रकांत पाटलांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख केल्याने फक्त राजकारणच नाही तापले, तर मराठा संघटनाही आक्रम झाल्याचे पहायला मिळत आहे.

पाटलांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीची सडकून टीका

जात…पात…धर्म न मानता, शिवाजी महाराज पुढे गेले. अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मात्र महाराजांच्या कामाला व्होट बँकेचं रुप देऊन नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय.

राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

आता हिंदू व्होट बँकेचा विषय, तोही चंद्रकांत पाटलांनी काढल्यावर शिवसेना कशी शांत राहिल. महाराजांचाच विचार बाळासाहेबांनी महाराष्ट्रात रुजवला आणि हिंदूची व्होट बँक आहे, हा विचार पहिल्यांदा बाळासाहेबांनी मांडला, असं म्हणून राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला.

शिवसेना काँग्रेससोबत गेल्यापासून, भाजप कायम हिंदुत्वावरुन शिवसेनेला डिवचण्याचं काम करतेय..केंद्रातले नेतेही उघडपणे हिंदुत्वावर बोलून मतांचा जोगवा मागतात. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांचं देवदर्शन सुरु झालंय..अर्थात डोळ्यासमोर हिंदू व्होट बँकच आहे. मात्र हिंदू व्होट बँक या राजकीय शब्दाशी छत्रपती शिवाजी महाराजांना जोडणं, हे कोणालाही न पटणारचं असेल.

Education: कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार नाही, शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

अखेर रुपाली पाटील यांचं ठरलं, हाती ‘घड्याळ” बांधणार; मुंबईत पक्षप्रवेश

Ajit Pawar: वशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यात होणार; कोकणातील पूरस्थिती नियंत्रणासाठी अनेक महत्वाचे निर्णय