Women’s Day | एकत्र कुटुंबाची पंचक्रोशीत चर्चा, सर्व मुलांना उच्च शिक्षण; स्वत: अशिक्षित

| Updated on: Mar 08, 2022 | 10:36 AM

आज ८ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने आपण अनेक महिलांचा सन्मान आणि प्रेरणादायी प्रवास अनेक माध्यमातून पाहत असतो. असचा एक प्रेरणादायी प्रवास आहे. सांगली (sangli) जिल्ह्यातील 32 शिराळा (shirala) तालुक्यातील चरण गावातल्या शालन बाबुराव घोलप (shalan baburao gholap) यांचा...

Womens Day | एकत्र कुटुंबाची पंचक्रोशीत चर्चा, सर्व मुलांना उच्च शिक्षण; स्वत: अशिक्षित
शालन घोलप त्यांच्या पतीसोबत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली – आज ८ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने आपण अनेक महिलांचा सन्मान आणि प्रेरणादायी प्रवास अनेक माध्यमातून पाहत असतो. असचा एक प्रेरणादायी प्रवास आहे. सांगली (sangli) जिल्ह्यातील 32 शिराळा (shirala) तालुक्यातील चरण गावातल्या शालन बाबुराव घोलप (shalan baburao gholap) यांचा…

काहीचं शिक्षण न घेतलेल्या शालन बाबुराव घोलप यांनी आत्तापर्यंत त्यांच्या कुटुंबियांना एक वेगळ योगदान दिलं आहे. बाबुराव घोलप पती सरकारी नोकरी करीत असताना शेती आणि कुटुंब संभाळले आहे. आजही घोलप परिवार इतक्या वर्षांपासून एकत्र असल्याने पंचक्रोशीत त्यांचं कुटुंब एकत्र असल्याची आजही चर्चा होते. दोन कुटुंबांना एकत्र ठेवण्यात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. कुटुंबातील सर्व मुलांना चांगलं शिक्षण देण्याकडे त्यांनी लक्ष दिलं. आज प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतोय.

सध्याच्या घडीला एकत्र कुटुंब संभाळणं किंवा एकत्र राहण किती अवघड आहे हे आपण पाहत असतो. परंतु बाबुराव घोलप आणि किसन घोलप यांचं कुटुंब एकत्र असल्याची आजही गावात चर्चा होते. ही एकरूपता जपण्यासाठी बाबुराव घोलप, किसन घोलप, शालन घोलप आणि आक्काबाई घोलप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शालन घोलप त्यांच्या पतीसोबत

आयुष्यातले सुरूवातीचे अनेक दिवस खडतर पाहिल्यानंतर एकत्र राहिल्यानंतर स्थिर राहता येईल या भूमिकेतून त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या मुलांचं आणि त्यांचं आयुष्य एका वेगळ्या टप्प्यावर गेल्याचं पाहायला मिळतं. बाबुराव घोलप हे नोकरी करीत असताना भाऊ किसन घोलप यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती उदरनिर्वाह करण्यापुरती असल्याने घरातील सगळे सदस्य शेतीत राबत राहिले. आज शेती सुध्दा इतक्या वर्षानंतर एकत्र असल्याची पाहायला मिळते. गावात किवा भागात अनेक घोलप घराणं एकत्र असल्याचं उदाहरण दिलं जातं.

सर्व मुलांना चांगलं शिक्षण दिलं

आपण जरी अशिक्षित असलो, तरी मुलांना चांगलं शिक्षण मिळावं हेतूने मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा शालन घोलप यांनी प्रयत्न केला. आज घरातील सगळी मुलं शिक्षित असल्याचा कुटुंबियाला समाजात गावात एक वेगळं स्थान आहे.

राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक, कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते, कोण आहेत कुणाल राऊत?

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचीच तक्रार

Russia Ukraine War Live : युक्रेनच्या खार्किवजवळ रशियन मेजर जनरल विटाली गेरासिमोव्हची हत्या