मुंबई : प्रत्येक पुरूषाच्या मागे एक खंबीर स्त्री (Women) असते, असे म्हटंलेले आपण नेहमीच ऐकतो. खरोखरच पुरूषाच्या यशामध्ये एका स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो, हे सत्य आहे. एक स्त्री आपल्या कुटुंबाच्या (Family) सुखासाठी अनेक त्याग करते. एवढेच नाही तर आजच्या काळात महिलांनी स्वतःला खूप सशक्त बनवले आहे. महिला आपल्या घरासोबतच सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. यासोबतच ती घर आणि आॅफिसच्या (Office) दोन्ही जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत आहे.
त्याग, समर्पण आणि क्षमतांचा सन्मान करा!
महिलांच्या त्याग, समर्पण आणि क्षमतांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. आज या निमित्ताने मी माझ्या आयुष्यातील एका ग्रेट स्त्रीबद्दल सांगणार आहे. माझी बहिण शरयू अशोक मुंडे…लहानपणापासून अत्यंत मेहनती, जिद्दी आणि हुशार…शाळेमधील टॅलेंटेड विद्यार्थ्यींनी म्हणून तिची ओळख. अत्यंत जिद्दी पण तेवढीच शांत स्वभावाची. रात्रीचा दिवस करून ती अभ्यास करायची. संपूर्ण शाळेतून 10 वीला पहिली आली. त्यानंतर इंजीनियरिंगमध्ये देखील टाॅप केले. तिने पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमीच धावते.. कधीही थांबत नाही ही तिच्यामधील विशेष गोष्ट आहे.
आज ती अमेरिकेच्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते. मात्र, कधीही ती स्वत: चा विचार न करता अगोदर फॅमिलीचा विचार करते. तिने आज जे काही मिळवले आहे, त्यासाठी तिने खूप कष्ट केले आहेत. मी पण एक स्त्री आहे…पण मला हे सांगायला नेहमीच अभिमान वाटतो की, मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या फॅमिलीमुळे आणि माझ्या बहिणीमुळेच आहे. आमच्या दोघी बहिणींना घडवण्यामध्ये माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.
प्रत्येक नात्याची जननी आहे महिला…
“स्त्री म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली एक शक्ती आहे,
स्त्री म्हणजे कित्येक नात्याची जननी आहे”
स्त्री म्हणजे अंतःकरणातील निघालेली हळवी हाक आहे,,
संबंधित बातम्या :