प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक, मुंबई : मी साधारण तिसरीत असताना म्हंटलं होतं की, जर मी पंतप्रधान झाले तर मी असा आदेश देईन की कुणी लग्नच (Marriage) करायचं नाही. यावर अचंबित होऊन आई-बाबांनी सहाजिक प्रश्न केला, कागं? त्यावर माझं त्यावेळचं बालीश उत्तर होतं की, लग्नच केलं नाही तर लोकसंख्या (Population) वाढणार नाही आणि मग लोक संख्या वाढली नाही तर लोकांना व्यवस्थित जेवण मिळेल! कारण ‘लोकसंख्या वाढीमुळेच’ अनेक लोकांना उपाशी राहावं लागतं असं माझ्याच वयाच्या भावानं मला सांगितलं होतं. आता या माझ्या तर्कावर घरी सगळेच हसले होते. आणि अशाने लोकसंख्या नियंत्रणात (Population Control) येत नाही इतकेच सांगितले होते. (व मी आयुष्यात कधीच राजकारणात जाऊ शकत नाही याची घरच्यांना खात्री पटली होती..) विनोदाचा भाग सोडा, पण आज हे आठवण्याचं कारण म्हणजे ‘जागतिक लोक संख्या दिन’!
1804 साली जगाची लोकसंख्या 1 अरब होती जी आज 2022 रोजी 7.9 अरब झालीय. जागतिक लोक संख्या दिनानिमित्त सध्या जगाची लोकसंख्या भरभक्कम प्रमाणात वाढत आहे. आता ही स्थिती खरच चिंताजनक आहे का? तर, ज्या देशांमधे लोकसंख्या नियंत्रणात आहे तिथे तसा प्रश्न नाही. पण काही देशांसाठी हो, कारण जिथे बेसुमार लोकसंख्या वाढत आहे त्या प्रांतासाठी अनेक प्रश्न आवासून उभे राहतात. सर्वसामान्य जीवन जगताना आपण त्या प्रश्नांना अनेकदा सामोरेही जातो, पण त्यामागचे हेच मुख्य कारण आहे, यापासून अनभिज्ञ असतात. काही कारणांचा आढावा घेऊया…
त्यामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या नियंत्रण हा प्रश्न जटिल होत चाललाय. यावर उपाय आहेत. भारता सारख्या देशानं अनेक उपाययोजनाही राबवल्या आहेत. आता या विषयावर केवळ एका-दुसऱ्याने नव्हे तर स्वतःला कर्तृत्ववान समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनेच विचार करणे आणि लोकसंख्ये बाबत तरी ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ या म्हणीला साजेसे वागण्याची अवश्यकता आहे. तसे न झाल्यास कितीही कमाई केली तरी ती तोकडीच पडणार, ‘बेसुमार लोकसंख्या वाढ’ हा भस्मासूरच आहे हे ज्यांनी ताडले व त्यावर उपायांनी साधले तेच जन धन्य!
(लेखिका टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीत वृत्त निवेदिका म्हणून काम करतात)