आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योगा केला.
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ITBP चे जवान लेह येथील पँगॉग तळ्याजवळ योगासन करताना.
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने देशाच्या उत्तर सीमेवर भारतीय जवानांची बर्फाच्छादीत डोंगर रागांमध्ये योगासनं.
15 हजार फुटापेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या सिक्कीच्या मुगुथांग सब सेक्टरमध्ये ITBP च्या जवानांनी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगासनं केली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग गुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी उत्तराखंडच्या हरिद्वार येथे योगासन केली. या कार्यक्रमात मुल आणि अन्य लोक सहभागी झाले होते.