Marathi News Photo gallery 46 years sameera reddy had bleeding during first pregnancy body transformed gain 105 kg weight got trolled
प्रेग्नेंसीमुळे अभिनेत्रीची हालत खराब, ब्लिडिंगमुळे चालणं मुश्किल, 105 किलो झालेलं वजन
बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिचा प्रेग्नेंसीचा अनुभव सांगितला आहे. आई बनण्याचा हा काळ तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. तिला कुठल्या स्थितीतून जावं लागलं ते समीराने सांगितलं.
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी बऱ्याच काळापासून स्क्रीनपासून लांब आहे. अभिनेत्री आता नवरा आणि दोन मुलांसोबत आनंदात संसार करतेय. समीराने आता देबीना बॅनर्जीच्या पॉडकास्टमध्ये आपली प्रेग्नेंसी आणि मदरहूड जर्नीबद्दल सांगितलं.
2 / 5
समीराने सांगितलं की पहिल्यांदा ती वयाच्या 37 व्या वर्षी आई बनली. पहिल्या प्रेग्नेंसीमध्ये खूप अडचणी आल्या. पहिल्या प्रेग्नेंसीवेळी माझी Prolactinoma शी झुंज सुरु होती. ज्यावेळी Prolactinoma ची पातळी वाढते, तेव्हा महिलांसाठी गर्भवती होणं कठीण बनतं.
3 / 5
पहिल्या प्रेग्नेंसीआधी समीराला याबद्दल समजलेलं. त्यानंतर औषधोपचाराने ती बरी झालेली. पहिल्या प्रेग्नेंसीवेळी खूप ब्लिडिंग व्हायची. त्यामुळे मला भिती वाटायची असं तिने सांगितलं. संपूर्ण दिवस बेडवर झोपून रहावं लागायच.
4 / 5
पहिल्या प्रेग्नेंसीवेळी 35 किलो अचानक वाढल्याच समीरा रेड्डीने सांगितलं. बाळाच्या जन्मानंतर माझं वजन 105 किलो झालेलं, असं ती म्हणाली.
5 / 5
वाढलेल्या वजनावरुन लोक त्यावेळी मला ट्रोल करायचे. लोकांचे टोमणे आणि डिप्रेशनमुळे ती शेलमध्ये गेलेली. घराच्या बाहेर पडायला सुद्धा ती घाबरायची. तिने तिचा आत्मविश्वास गमावलेला.