बॉलिवूडच्या ‘या’ सेलिब्रिटींनी केलीये कॅन्सरवर यशस्वी मात, आज जगतायेत आनंदी आयुष्य

झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटींनी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा सामना केला आहे. ज्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले तर अनेक सेलिब्रिटींनी कॅन्सरवर यशस्वी मात केली आहे. आज अशा सेलिब्रिटींवर जाणून घेवू ज्यांनी कॅन्सरवर मात केली आहे.

1 / 5
अभिनेत्री मनिषा कोईरालाहिला 29 नोव्हेंबर 2012 रोजी कर्करोगाचे निदान झालं होते. यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कर्करोगावर यशस्वी मात केल्यानंतर तिने आपला हा प्रवास पुस्तकाच्या रुपात चाहत्यांच्या भेटीला आणला होता.

2 / 5
90च्या दशकाची सुपरहिट अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला देखील कर्करोगाचे निदान झाले होते. न्यूयॉर्कमध्ये बऱ्याचकाळाच्या उपचारानंतर तिने कर्करोगावर यशस्वी मात केली.

3 / 5
प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल लिसा रेला 2009मध्ये एका दुर्मिळ कर्करोगाची लागण झाली होती. 2010मध्ये तिने कर्करोगमुक्त झाल्याची घोषणा केली होती.

4 / 5
2020 मध्ये संजय दत्तला कर्करोग झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेत गेला आणि गंभीर आजारावर मात केली.

5 / 5
दिग्दर्शक अनुराग बासुंना 2004मध्ये रक्ताच्या कर्करोगाची लागण झाली होती. या उपचारादरम्यान त्यांनी ‘लाइफ इन मेट्रो’, ‘गँगस्टर’ आदी चित्रपटांची कथा लिहिली होती. उपचारानंतर त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली होती.