Aishwarya Rai | ‘त्या’ घटनेनंतर ऐश्वर्या राय हिच्या सुरक्षेसाठी 50 बॉडीगार्ड्स होते तैनात; अखेर सत्य समोर
मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तरी देखील अभिनेत्रीच्या अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. पण एक काळ होता जेव्हा सर्वत्र ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याच्या चर्चा रंगायच्या. 'जोधा अकबर' सिनेमानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी ५० बॉडीगार्ड्स तैनात होते. ज्यामागचं कारण देखील फार मोठं आहे...