कतरिना कैफ हिच्यासाठी सलमान खान याने घेतला थेट प्रोड्यूसरसोबत पंगा, भर पार्टीतच…
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कतरिना कैफची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. कतरिना कैफ आणि सलमान खान यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केले. मात्र, त्यानंतर यांचे ब्रेकअप झाले.
1 / 5
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. सलमान खान याने ऐश्वर्या राय हिला देखील काही वर्ष डेट केले. कतरिना कैफ आणि सलमान काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
2 / 5
चक्क कतरिना कैफ हिच्यासाठी एका प्रोड्यूसरसोबत भर पार्टीमध्ये सलमान खानने पंगा घेतला होता. नुसता पंगाच नाही तर थेट गोष्ट हाणामारीपर्यंत पोहोचली होती.
3 / 5
संजय दत्त याने पत्नीसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. त्याच पार्टीमध्ये हा प्रकार घडला होता. प्रोड्यूसर बंटी वालियासोबत वाद झाला होता.
4 / 5
कतरिना कैफला 'स्विंडलर्स' या फ्रेंच चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवायचा होता. या चित्रपटातून कतरिनाला तिची बहीण इसाबेल कैफला बॉलिवूडमध्ये लॉन्च करायचे होते. नंतर कतरिनाने 'स्विंडलर्स'चे हक्क विकत न घेण्याचा निर्णय घेतला.
5 / 5
बंटी वालियाने या फ्रेंच चित्रपटाचे हक्क विकत घेतले आणि त्याचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला. सलमान खान याला ज्यावेळी ही गोष्ट समजली तेव्हा त्याला ते आवडले नाही आणि त्याने संजय दत्तच्या पार्टीतच निर्मात्याशी भांडणे केली.