नेमकं कुठे चुकलं? राहुल महाजनचे तीनही लग्न का टिकले नाहीत? दोघींकडून तर गंभीर आरोप
राहुल महाजनचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरला. काही महिन्यांपूर्वी त्याने तिसरी पत्नी नताल्या इलिनाला घटस्फोट दिला. या घटस्फोटानंतर खूप खचल्याचं त्याने सांगितलं होतं. पण राहुल महाजनचे आधीचे दोन लग्नसुद्धा का टिकले नाहीत, दोघींकडून कोणते आरोप झाले, ते जाणून घेऊयात..
1 / 7
टेलिव्हिजनवरील 'स्मार्ट जोडी' या शोमध्ये राहुल महाजन त्याची तिसरी पत्नी नताल्या इलिनासोबत झळकला होता. मात्र राहुलचं हे तिसरं लग्नसुद्धा टिकलं नाही. राहुल महाजन त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे.
2 / 7
राहुलने 2006 मध्ये श्वेता सिंहशी लग्नगाठ बांधली होती. लग्नापूर्वी बऱ्याच वर्षांपासून दोघं एकमेकांना ओळखत होते. अमेरिकेतील फ्लाइंग स्कूलमध्ये दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं होतं. मात्र या दोघांचं लग्न दोन वर्षेच टिकलं. 2008 मध्ये राहुल आणि श्वेताने घटस्फोट घेतला.
3 / 7
2007 मध्ये श्वेता आणि राहुलने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यावेळी श्वेताने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. दोघांमध्ये कधीच न मिटणारे मतभेद निर्माण झाले आहेत, अशी प्रतिक्रिया श्वेताच्या वडिलांनी दिली होती. अखेर 2008 मध्ये परस्पर संमतीने श्वेता आणि राहुलने घटस्फोट घेतला.
4 / 7
पहिल्या लग्नातील अपयशानंतर राहुलने स्वयंवर आयोजित केला होता. टीव्ही शोच्या माध्यमातून दुसरी पत्नी शोधण्याचा निर्णय त्याने घेतला होता. 'राहुल दुल्हनियाँ ले जायेगा' असं या शोचं नाव होतं. या शोमध्ये त्याला डिंपी गांगुली भेटली. 2010 मध्ये त्याने डिंपीशी लग्न केलं.
5 / 7
लग्नानंतर डिंपी आणि राहुलच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. लग्नाच्या काही महिन्यांतच डिंपीनेही राहुलवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. लाथ मारणं, धक्के मारणं, केसांनी ओढणं असे अनेक आरोप तिने राहुलवर केले होते. अखेर 2015 मध्ये हे दोघं विभक्त झाले.
6 / 7
यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये राहुलने रशियन मॉडेल नताल्या इलिनाशी लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या दोघांनी 'स्मार्ट जोडी' या रिअॅलिटी शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. या दोघांचंही लग्न फक्त चार वर्षे टिकलं.
7 / 7
"राहुल आणि नताल्या यांच्यात सुरुवातीपासूनच बऱ्याच समस्या होत्या. तरीसुद्धा दोघांनी हे लग्न जितकं टिकवता येईल तितकं टिकवलं होतं", असं म्हटलं गेलं. राहुलने बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्येही भाग घेतला होता. त्यावेळी त्याचं नाव अभिनेत्री पायल रोहतगीशी जोडलं गेलं.