चंद्रगुप्त मौर्य यांचे राजकीय तज्ज्ञ आचार्य चाणक्य हे मोठे धोरणी आणि मुत्सद्दी होते. त्यांच्या नीतीशास्त्राचे धडे आजही उपयोगात येतात. जीवनात हे उदाहरण अनेकांना पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरतात.
आचार्य चाणक्य यांनी संस्कृत श्लोकातून गाढवाचे तीन महत्त्वाचे गुण सांगितले. गाढव कितीही थकले तरी ते ओझे वाहते. ते अविरत काम करते. ते नेहमी शांत असते. हुशार व्यक्तीने त्याचा हा गुण नेहमी हेरला पाहिजे.
चाणक्य नीतीशास्त्राप्रमाणे गाढवाकडून कठोर परिश्रमाचा गुण घेतला पाहिजे. ऋतु कोणताही असो त्याची तमा न बाळगता, प्रत्येकाने संकटांचा सामना तर करावाच पण आपल्या लक्ष्यावरून विचलित होऊ नये.
जबाबदारीपासून पळणाऱ्या व्यक्तीला कधीच लवकर यश आणि मोठे पद मिळत नाही. गाढव हे कर्तव्यापासून मागे हटत नाही. ते दिलेली जबाबदारी इमानदारीने पूर्ण करते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कार्यक्षेत्रात कष्ट हे घेतलेच पाहिजे.
गाढवाचा गुण म्हणजे ते कुरकुर करत नाही. कामाला सहसा नाही म्हणत नाही. ते नेमाने ठरलेले काम पूर्ण करते. ते काम करताना ते त्रागा करत नाही. त्यामुळे समाधानाने आणि आनंदाने काम करणे आवश्यक आहे.
प्रामाणिकपणा हा सुद्धा गाढवाचा मोठा गुण आहे. तुमच्या कामाप्रती तुम्ही जितके प्रामाणिक राहाल, नवीन काही शिकण्याचा प्रयत्न कराल, तितका आत्मविश्वास तर वाढलेच पण त्यात तुम्ही निष्णात व्हाल.