अभिजीत आणि सुखदा खांडकेकर यांच्या लग्नाचा आज 9 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त या दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिजीतने आपल्या इन्स्टाग्रामवर सुखदासोबतचा फोटो शेअर आहे. 'आपल्या लग्नाला आज 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. कायम माझ्यासोबत राहण्यासाठी थँक्यू...', असं अभिजीतने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
सुखदाने लग्नाच्या वेळचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. '9 आकडा पूर्णत्व दर्शवतं. तसंच नव्याची सुरूवात दाखवतं. या पूर्णत्वाचा मी अनुभव घेतेय. येणाऱ्या काळातही असंच कायम सोबत राहूयात. मी पुढच्या आपल्या सोबतच्या प्रवासासाठी प्रचंड उत्साही आहे. लव्ह यू अभी...', असं सुखदाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
अभिजीत खांडकेकर हे नाव 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या झी मराठीवरच्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलं. त्यानंतर त्याने 'माझी या प्रियाला प्रित कळेना',' माझ्या नवऱ्याची बायको' या टीआरपीच्या सर्वोच्चस्थानी असणाऱ्या मालिकांमध्ये काम केलं. त्यांने अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सूत्रसंचालन केलं आहे. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'मी पण सचिन' ही त्याच्या गाजलेल्या सिनेमांची नावं सांगता येतील. तसंच 'सोपं नसतं काही' ही प्लॅनेट मराठीवर त्याची वेबसिरीजही चांगलीच चर्चेत आहे.
सुखदादेखील अभिनय क्षेत्रात आहे. तिने 'बाजीराव मस्तानी' या ब्लॉकबस्टर हिंदी सिनेमात बाजीरावची बहिण अनुबाईचं पात्र साकारलं होतं.