Marathi News Photo gallery According to acharya chanakya if you want to be happy in life then do not stay with these kind of people
Chanakya Niti | आयुष्यात आनंदी राहायचंय? तर या लोकांपासून चार हात लांबच राहा
आचार्य चाणक्य (Acharya chanakya) हे एक कुशल अर्थतज्ञ, रणनीतिकार, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. आचार्य यांनी त्यांच्या आयुष्यात खूप समस्यांना (Problem) समोरे गेले. त्यांचे अनुभव त्यांनी चाणक्या नीतीमध्ये लिहले आहेत.
1 / 5
आचार्य चाणक्य (Acharya chanakya) हे एक कुशल अर्थतज्ञ, रणनीतिकार, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. आचार्य यांनी त्यांच्या आयुष्यात खूप समस्यांना (Problem) समोरे गेले. त्यांचे अनुभव त्यांनी चाणक्या नीतीमध्ये लिहले आहेत.जेणे करुन लोकांना काही त्रास झाल्यास त्यांना त्यांच्या समस्येचे उत्तर चाणक्य नीती (Chankaya Niti)मध्ये मिळेल.
2 / 5
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात तीन प्रकारच्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. असे लोक केवळ स्वतःच नकारात्मक नसतात, तर ते तुमच्यात ही नकारात्मकता भरतात.
3 / 5
मूर्ख व्यक्तीशी जास्त बोलू नका : आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की एखाद्या मूर्ख व्यक्तीशी कधीही जास्त बोलू नये किंवा त्याने जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही त्याला कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तो नेहमी स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. अशा स्थितीत तुमची ऊर्जा वाया जाईल, तसेच तुमच्यामध्ये राग आणि चिडचिड निर्माण होईल.
4 / 5
दुष्ट स्त्रीवर दया करू नका : चाणक्य नीतीनुसार, इतरांना मदत करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु दुष्ट स्त्री जी इतरांसाठी चुकीचे विचार ठेवते. अशा स्त्रीवर विश्वास ठेवू नये. जर तुम्ही त्यांच्यावर दया केली तर ती तुमच्या मदतीचा फायदा घेऊ शकते. त्यामुळे स्वार्थी लोकांपासून लांब राहणंच हिताचं ठरेल.
5 / 5
स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा – चाणक्य नीतिनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कोणत्याही क्षणाला तुमचा विश्वासघात करु शकतात.