बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही कायमच चर्चेत असते. करिश्मा कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. करिश्मा कपूर हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.
आता नुकताच अभिनेता हरीश कुमार याने करिश्मा कपूर हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. करिश्मा कपूर आणि हरीश कुमार यांनी प्रेम कैदी या चित्रपटात एकसोबत भूमिका साकारली.
हरीश कुमार म्हणाला की, चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये स्वीमिंग पूलमध्ये करिश्मा कपूरला बुडताना वाचवायचे होते. करिश्माने पूलमध्ये उडी मारली.
करिश्मानंतर हरिश कुमार यानेही स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली. त्यानंतर हरिश कुमार हा बुडत होता. सर्वांना वाटले की, तो फक्त मजाक करत आहे.
यावेळी करिश्मा कपूर ही हरीश कुमारला वाचवते. हरिश कुमार म्हणाला की, मला त्यावेळी स्वीमिंग येत नव्हते. परंतू मी उडी मारली. आता अभिनेत्याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. करिश्मा कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.