अभिनेता करण वीर मेहरा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. करण मेहरा हा रोहित शेट्टी याच्या 'खतरो के खिलाडी'मध्ये धमाका करताना दिसणार आहे.
अभिनेता गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. करण वीर मेहरा याने काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतलाय.
करण वीर मेहरा याने एक्स पत्नीबद्दल म्हटले की, मला वाटते की, निधीने तिच्या होणाऱ्या जोडीदारासोबत सुखी राहावे. तिने प्रगती करावी आणि तिला व्यवसायामध्ये यश मिळावे.
निधीने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, करण वीर मेहरासोबत लग्न करणे ही तिची मोठी चूक होती. यावर करण म्हणाला की, बरे झाले तिला तिची चूक योग्य वेळी समजली.
2009 मध्ये करणने आपली बालपणीची मैत्रिण देविका हिच्यासोबत लग्न केले होते. मात्र, हे लग्न देखील फार काळ टिकू शकले नाही.