श्रेयस तळपदे हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव. श्रेयसने अनेक मराठी हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. श्रेयस मुळचा मुंबईचा अंधेरीतील श्री राम वेल्फेअर सोसायटीच्या हायस्कूलमध्ये त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर विलेपार्लेमधल्या मिठीबाई कॉलेजमध्ये त्याने उच्च शिक्षण घेतलं.
'आँखे' या हिंदी चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. 34 हिंदी चित्रपटात त्याने काम केलं आहे. तसंच 7 मराठी सिनेमांमध्ये त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 10 मराठी मालिकांमध्येही त्याने काम केलंय.
द लायन किंग, पुष्पा या चित्रपटांसाठी त्याने डब केलं आहे. पुष्पा या मूळ तेलगू भाषेतील चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी श्रेयसने आवाज दिला आहे. त्याच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होतंय.
ओम शांती ओम, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, सिंबा ही त्याच्या निवडक हिंदी चित्रपटांची नावं सांगता येतील.
मराठीतील पछाडलेला, सावरखेड- एक गाव, सनई चौघडे, पोस्टर बॉईज, बाजी हे त्याचे मराठी चित्रपटही गाजले. आभाळमाया या गाजलेल्या मराठी मालिकेतही त्याने काम केलं आहे. दामिनी, अवंतिका या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. सध्या झी मराठीवरची त्याची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रचंड गाजतेय.