ही अभिनेत्री दिसणार थेट ‘बिग बॉस 18’मध्ये, सलमान खान याच्यासोबत…
बिग बॉस 18 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉसच्या प्रत्येक सीजनला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळते. यंदा सलमान खान हाच या सीजनला होस्ट करणार असल्याचे आता स्पष्ट आहे.
1 / 5
बिग बॉस सीजन 18 सध्या चांगलेच चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये या सीजनबद्दल मोठी क्रेझही बघायला मिळतंय. सलमान खान हाच या सीजनला होस्ट करणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
2 / 5
पुढील आठवड्यात शोचा प्रोमो सलमान खान शूट करेल. बिग बॉस सीजन 18 ची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना सध्या दिसत आहेत. हे सीजन धमाका करणार असल्याचे दिसत आहे.
3 / 5
काही दिवसांपूर्वीच शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी ही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. अनेक प्रसिद्ध नावे या सीजनमध्ये सहभागी होणार आहेत.
4 / 5
नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार अभिनेत्री निया शर्मा ही देखील बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच निर्मात्यांनी तिला शोची ऑफर दिली होती.
5 / 5
अनेक वर्ष अभिनेत्री निया शर्मा हिने बिग बॉससाठी नकार दिला होता. आता तिने बिग बॉससाठी होकार दिलाय. निया शर्माची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.