रेखाने ‘या’ अभिनेत्रीला मारली जोरात कानाखाली, अभिनेत्रीने रडत रडत…
अभिनेत्री रेखा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रेखा यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. एक मोठा काळ त्यांनी बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे त्यांचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे.
1 / 5
बॉलिवूडमधील अनेक किस्से कायमच चर्चेत असतात. त्यापैकी एक म्हणजे रेखा यांनी शूटिंगमध्ये एका अभिनेत्रीच्या कानाखाली लावली आणि याची कल्पना त्या अभिनेत्रीला अजिबातच नव्हती.
2 / 5
यानंतर त्या अभिनेत्रीने रडून रडून पूर्ण सेटवरच गोंधळ केला. अभिनेत्री आरतीने लज्जा या चित्रपटातून पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात रेखा, माधुरी दीक्षित, महिमा चौधरी, सोनाली बेंद्रे, जॅकी श्रॉफ, अजय देवगण या कलाकारांसोबत काम केले.
3 / 5
चित्रपटातील एका सीनसाठी रेखाने आरतीच्या कानाखाली लावली. मात्र, याबद्दल काहीच कल्पना आरतीला नव्हती, ज्यावेळी हा सीन शूट झाला, तेंव्हा तिला धक्का बसला.
4 / 5
ती सतत रडत होती. त्यानंतर रेखा आणि राजकुमार संतोषी यांनी हा सीन आवश्यक असल्याचे तिला सांगितले आणि तिची समजूत काढली.
5 / 5
आरती तशी आता चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. पहिल्याच चित्रपटात तिला इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.