हिरामंडी अभिनेत्री संजीदा शेख ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही तूफान चर्चेत आहे. संजीदा शेखचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झालाय.
संजीदा शेख हिचे नाव अभिनेता हर्षवर्धन याच्यासोबत जोडले जात आहे. मात्र, संजीदा शेख आणि हर्षवर्धन यांनी अजूनही त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाहीये.
संजीदा शेखने 2012 मध्ये अभिनेता आमिर अली याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या आठ वर्षांनंतर यांनी विभक्त होण्याच्या निर्णय घेतला. यांची एक मुलगी देखील आहे.
काही दिवसांपूर्वीच संजीदा शेख हिने म्हटले की, प्रेमाचे अनेक अर्थ आहेत. आपल्या मित्रांसोबतही एक वेगळे नाते असते. माझा घटस्फोट झाल्यानंतर माझ्या अनेक मित्रांनी मला मदत केली.
संजीदा शेख आणि हर्षवर्धन लवकरच त्यांच्या रिलेशनवर भाष्य करतील असे सांगितले जातंय. संजीदा शेख हर्षवर्धन याच्यासोबत लग्न करणार असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.