हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत
आलिया भट्टची कॉपी असणाऱ्या किंवा तिच्याप्रमाणे बरेचसे साम्य असणाऱ्या अभिनेत्रींची सध्या चर्चा आहे. त्यातील एक तर अगदीच हुबेहूब आलियासारखी दिसते. तिच्या फोटोंना पाहून चाहतेही फसतात.
1 / 7
असे म्हटले जाते की जगात सात लोकं एकसारखी दिसतात. अभिनेत्रींमध्येही असं पाहायला मिळतं एका अभिनेत्रीप्रमाणे दिसणाऱ्या किंवा थोड्याफार प्रमाणात साम्य असणाऱ्या इतरही अभिनेत्री दिसतात.
2 / 7
यातच आता आलिया भट्टची कॉपी असणाऱ्या किंवा तिच्याप्रमाणे बरेचसे साम्य असणाऱ्या अभिनेत्रींची सध्या चर्चा आहे. त्यातील एक तर अगदीच हुबेहूब आलियासारखी दिसते. तिच्या फोटोंवर नेहमी आलिया भट्टची कॉपी असलेल्या कमेंट येतात.
3 / 7
ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडमधील सेलेस्टी बैरागी आहे. 'तिने उडती का नाम रज्जो' या शोमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबत सेलेस्टी मीडिया इन्फुएन्सरही आहे.
4 / 7
सोशल मीडियावर सेलेस्टीचे अनेक असे फोटो आहेत ज्यात ती हुबेहूब आलियासारखीच दिसते. तिचे फोटो पाहून अनेकदा चाहतेही फसतात. ती सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे एक कारण हेही आहे. तिचे डोळे सुंदर असल्याच्या कमेटही चाहते नेहमी करत असतात.
5 / 7
यात दुसरं नावं आहे पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री हानिया आमिर. तिच्या कामापेक्षाही तिच्या दिसण्यामुळे फारच प्रसिद्ध आहे. ती आलिया भट्टसारखी दिसते म्हणून तिला पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून ओळखू लागले आहेत.
6 / 7
हानियानं सांगितलं की, तिच्या गोल चेहऱ्यामुळे आणि डिंपल्समुळे लोक तिला पाकिस्तानची आलिया भट्ट म्हटलं जातं. तसेच एका ब्रँडने तिला ती आलिया भट्टसारखी दिसते म्हणून साईन केल्याचे सांगितले.
7 / 7
त्या ब्रँडला वाटलं की, पाकिस्तानातही आलियासारखा सिमिलर फेस मिळाला पाहिजे, जो इनोसेंट असेल आणि चेहऱ्यावर डिंम्पलही असतील. त्यावेळी त्या ब्रँडनं हानिया आमिरला अप्रोच केलं आणि तिला काम मिळालं. यामुळे हानिया आमिरनं आलिया भट्टचे आभार मानलेत.