Skin care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून बचाव करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

| Updated on: Nov 15, 2022 | 12:59 PM

1 / 5
थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. या ऋतूमध्ये बऱ्याच लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यासाठी लोक अनेक सौंदर्य प्रसाधनांचा उपयोगही करतात. मात्र तेवढेच पुरेसे नाही. आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास तुम्हाला त्वचा कोरडी पडण्याचा त्रास होणार नाही. त्यासाठी रोजच्या आहारात काही हेल्दी पदार्थांचा समावेश करून त्याचे सेवन करावे.

2 / 5
रताळं - रताळ्यामध्ये बीटा कॅरोटिन असते, तसेच व्हिटॅमिन ए व सी हेही असते. जे कोलेजन वाढवण्याचे काम करते. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते.

3 / 5
सुका मेवा - सुक्या मेव्यामध्ये हेल्दी फॅटट्स असतात, जे आपला मेंदू व हृद्य या दोन्हींसाठी फायदेशीर असतात. तसेच त्यामुळे आपली त्वचाही हायड्रेटेड राहण्यास मदत होते.  हिवाळ्यात शुष्क त्वचा नको असेल तर सुक्या मेव्याचे सेवन करावे.

4 / 5
पालक - व्हिटॅमिन ए व सी यांचा उत्तम स्त्रोत म्हणजे पालक. तो कोलेजन उत्पादनास मदत करतो. तसेच त्यामुळे त्वचाही हायड्रेटेड राहते. हिवाळ्यात पालकाचे सेवन केल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होऊ शकतो.

5 / 5
किवी - किवीमध्ये व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असते, जे आपली त्वचा हायड्रेटेड राखण्यास मदत करते. हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा हेल्दी व निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही किवीचे सेवन करू शकता. त्यामुळे तुमच्या त्वचेचा कोरडेपणाही दूर होण्यास मदत होईल.