Marathi News Photo gallery After beat canada how much chances of pakistan to reach super 8 in T20 world cup 2024 match against ireland rain major problem in florida
T20 World Cup 2024 : कॅनडाला हरवलं, आता पाकिस्तानचे सुपर-8 मध्ये पोहोचण्याचे चान्सेस किती? समजून घ्या गणित
T20 World Cup 2024 : पाकिस्तानी टीमवर टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याचा धोका आहे. बाबर आजमच्या टीमने कॅनडाला हरवून थोडा सुटकेचा निश्वास सोडलाय. पण आता त्यांच्या टीमसाठी एक वाईट बातमी आहे. पाकिस्तानचा खेळ बिघडवण्यासाठी एका नवीन संकट समोर ठाकलय.
1 / 10
T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानी टीमचा बराच संघर्ष सुरु आहे. अमेरिका आणि भारताकडून पराभूत झाल्यानंतर सुपर-8 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी पाकिस्तानला आपले उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
2 / 10
पाकिस्तानने कॅनडाला हरवलय. त्यामुळे पाकिस्तानसाठी आशेचा किरण निर्माण झालाय. आता त्यांचा पुढचा सामना आयर्लंड विरुद्ध फ्लोरिडामध्ये होणार आहे. पण त्याआधी पाकिस्तानी टीम पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे.
3 / 10
पाकिस्तानी टीमला आधी अमेरिकेने अडचणीत आणलं. आता पाकिस्तानचा पुढचा प्रवास अमेरिकेवरच अवलंबून आहे. पण यावेळी अमेरिकेपेक्षा पण जास्त अडचण पावसाची आहे.
4 / 10
टुर्नामेंटमध्ये पुढे जाण्यासाठी पाकिस्तानी टीम आपल्या विजयाशिवाय अमेरिकेच्या पूर्ण पराभवावर अवलंबून आहे. कॅनडाला हरवून पुढे जाण्याच्या दिशेने त्यांनी एक पाऊल टाकलय. आता पाकिस्तानचा पुढचा सामना आयर्लंड विरुद्ध आहे.
5 / 10
या मॅचआधी पाकिस्तानसाठी एक वाईट बातमी आहे. पाकिस्तानच्या या सामन्यात पाऊस पाणी फिरवू शकतो, अशी बातमी आहे. फ्लोरिडामध्ये पुढचा एक आठवडा पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे.
6 / 10
याच उदहारण 12 जूनला नेपाळ-श्रीलंक सामन्या दरम्यान पहायला मिळालय. पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. श्रीलंकन टीमच आता स्पर्धेतून बाहेर होण जवळपास स्पष्ट झालय.
7 / 10
पाकिस्तान-आयर्लंड सामन्यामध्ये पाऊस अडथळा आणण्याची शक्यता 91 टक्के आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही टीमना प्रत्येकी एक-एक पॉइंट मिळेल. पाकिस्तानचे 3 पॉइंट होतील.
8 / 10
अमेरिका आणि भारत आधीच 4 पॉइंटसह ग्रुप ए मध्ये नंबर एक आणि नंबर दोनच्या पोजिशनवर आहे. असं झाल्यास पाकिस्तानच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
9 / 10
पाकिस्तानने कॅनडावर 15 चेंडू राखून विजय मिळवला. त्यामुळे सुपर-8 मध्ये क्वालिफाय होण्याची त्यांना संधी आहे. पण दुसऱ्या सामन्यांच्या निकालावरही त्यांना अवलंबून रहाव लागणार आहे. त्यांचा नेट रनरेट आता 0.191 आहे.
10 / 10
आयर्लंडला हरवल्यानंतर त्यांच्या क्वालिफाय होण्याची संधी आणखी वाढेल. अमेरिकेनेही त्यांचे उर्वरित दोन सामने गमावले, तर पाकिस्तान सुपर-8 मध्ये पोहोचेल.