Marathi News Photo gallery After defeat from pbks chennai super kings in problems deepak chahar injury mustafizur rahman leave ipl 2024
IPL 2024 : 14 कोटीच्या खेळाडूला दुखापत, 2 कोटीचा बॉलर बाहेर, एमएस धोनीची CSK मोठ्या संकटात
IPL 2024 : पुन्हा आयपीएलच विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने चेन्नई सुपर किंग्सची टीम मैदानात उतरली आहे. पण त्यांचं प्रदर्शन खास नाहीय. चेन्नईच्या टीमला आपल्या घरच्या मैदानात चेपॉकवर पराभवाचा सामना करावा लागतोय. नवीन कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईची टीम 10 पैकी पाच सामने जिंकू शकलीय.
1 / 5
डिफेंडिंग चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सला IPL 2024 मध्ये पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा प्लेऑफ प्रवेशाचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. एकाबाजूला टीमचा आपल्याच घरात पराभव झाला. दुसऱ्याबाजूला काही खेळाडूंमुळे CSK च्या चिंता वाढल्या आहेत.
2 / 5
ऋतुराज गायकवाडच्या टीमला आपल्याच घरात पंजाब किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने चेन्नईला त्यांच्याच स्पिनच्या जाळ्याच अडकवून 6 विकेटने हरवलं. पराभवासोबतच स्टार गोलंदाजाच्या दुखापतीमुळे चेन्नई टीमच्या अडचणी वाढल्या आहेत.
3 / 5
पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक चाहरला दुखापत झाली. चाहरला दुसऱ्या चेंडूनंतर मैदान सोडावं लागलं. कारण त्याचा पाय दुखत होता. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलय. त्यानंतर दीपक चाहर पुन्हा मैदानात परतला नाही. दीपक चाहरला CSK ने 14 कोटी मोजून विकत घेतलं आहे. तो या सीजनमध्ये अजून किती मॅच खेळू शकेल, हे आता सांगण थोडं घाईच ठरेल.
4 / 5
फक्त चाहरच नाही, चेन्नईचे अजून दोन प्रमुख गोलंदाज फिटनेसच्या समस्येचा सामना करतायत. ते या सामन्यात खेळू शकले नाहीत. या सीजनमध्ये उत्तम गोलंदाजी करणारा श्रीलंकेचा पेसर मतीषा पतिरणाला दुखापत झालीय. डेथ ओवर्स स्पेशलिस्ट तुषार देशपांडे तब्येत बिघडल्याने या सामन्यात खेळू शकला नाही.
5 / 5
चेन्नईची चिंता वाढली आहे. कारण डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर गेलाय. 2 कोटी रुपयात विकत घेतलेल्या बांग्लादेशी पेसरचा या सीजनमधील हा शेवटचा सामना होता. आता तो बांग्लादेशी टीममध्ये परतलाय. तिथे झिम्बाब्वे विरुद्ध T20 सीरीज खेळणार आहे.