Sairat | आधी 4 लाख, मग सैराट हिट झाल्यावर रिंकू-आकाशाला बोनसमध्ये किती कोटी मिळाले माहितीय का?
Sairat | सैराट मराठी चित्रपट सृष्टीतील दीर्घकाळ लक्षात राहणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने इतिहास रचला. फार कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी कोटी-कोटीची उड्डाण घेतली होती. रिंकू-आकाशला सुरुवातीला काही लाख मिळाले. पण चित्रपट हिट झाल्यानंतर बोनस म्हणून किती कोटी मिळाले? हे माहितीय का?
-
-
‘सैराट’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षक कधीच विसरु शकत नाहीत. हा मराठी सिने सृष्टीतला बॉक्स ऑफिसवरचा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने इतिहास रचला होता.
-
-
या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा खूप फायदा झाला. हा चित्रपट सुपरडूपर हिट झाला. ग्रामीण महाराष्ट्राने हा चित्रपट उचलून धरला.
-
-
सैराटमधून ग्रामीण भागातील जाती व्यवस्थेवर भाष्य करण्यात आलं होतं. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट होता. अवघ्या 4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता.
-
-
सैराटमधील अर्ची आणि परश्याची जोडी हिट ठरली. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्याभोवती या चित्रपटाच कथानक गुंफल होतं.
-
-
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांची चित्रपट सृष्टीची पार्श्वभूमी नव्हती. अत्यंत सामान्य कुटुंबातून हे दोघे आले होते. त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांना जास्त भावली.
-
-
सैराट चित्रपटाची घोषणा झाली, त्यावेळी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांना प्रत्येकी 4 लाख रुपये देऊन करारबद्ध करण्यात आलं होतं.
-
-
सैराट चित्रपटाने नागराज मंजुळे यांना सुद्धा दिग्दर्शक म्हणून एक वेगळी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाने भारतात तब्बल 80.98 कोटींची कमाई केली. जगभरात या चित्रपटाच कलेक्शन 110 कोटी रुपये होतं.
-
-
सैराट हे बॉक्स ऑफिसवरील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट आहे. आजही या चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.
-
-
सैराट चित्रपटाच्या यशानंतर निर्माते नितीन केणी आणि सह निर्माते निखील साने यांनी रिंकू आणि आकाशला बोनस म्हणून 5 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मुंबई मिररने हे वृत्त दिलय.
-
-
इतक्या साऱ्या पैशांच काय करणार? हा प्रश्न आकाशाल विचारला तेव्हा तो म्हणाला की, मला माहित नाही. रिंकूने अकजुल सोलापूरला जाऊन अभ्यास सुरु ठेवणार असल्याच तेव्हा म्हटलं होतं.