फॉक्स न्यूजच्या रिपोर्ट्नुसार अमेरिकी काँग्रेस राष्ट्राध्यक्षांचा वेतन ठरवते. अमेरिकेत दोन सभागृहाची मिळून काँग्रेस बनली आहे. राष्ट्राध्यक्षांचा वेतन वाढवण्याचा निर्णय त्यांनी 2001 साली घेतला होता. त्यावेळी जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी संभाळली होती.
2001 पासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या सेवेसाठी दरवर्षी 4 लाख अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय चलनात एकूण 3 कोटी 45 लाख 81 हजार 420 रुपये वेतन मिळते. त्याशिवाय राष्ट्राध्यक्षांना 50 हजार डॉलरचा खर्च भत्ता सुद्धा मिळतो.
31 यू.एस.कोडच्या सेक्शन 1552 नुसार या खर्च भत्त्याचा कुठलाही हिस्सा खर्च झाला नाही, तर ती रक्कम अमेरिकी ट्रेजरीमध्ये परत जाते. त्याशिवाय व्हाइट हाऊस अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच निवासस्थान असेल. तिथलं अमेरिकन सरकारच फर्नीचर आणि अन्य सामनाचा उपयोग करण्याचा अधिकार असेल.
BBC नुसार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मनोरंजन, स्टाफ आणि कुकसाठी वर्षाला 19 हजार डॉलर्स म्हणजे 60 लाख रुपये मिळतात. त्याशिवाय व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करताना 10 हजार डॉलर म्हणजे 84 लाख रुपये दिले जातात.
कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत राष्ट्राध्यक्ष फॅमिलीसोबत व्हाइट हाऊसमध्ये राहू शकतात. दौऱ्यावर असताना हॉटेल आणि तिथला निवास अशा सुविधा दिल्या जातात. प्रवासासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आलिशान लिमोजिन कार, एक मरीन हेलिकॉप्टर आणि एअर फोर्स वन हे विमान मिळतं. एअर फोर्स वनमध्ये चार हजार वर्ग फूट जागा आहे. याला फ्लाइंग व्हाइट हाऊस म्हटलं जातं.