मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC WTC) स्पर्धेची बुधवारी सांगता झाली. न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला (India vs New Zealand) पराभूत करत WTC ची ट्रॉफी आपल्या नावे केली. जिंकल्यानंतर सर्व संघाने मैदानात आनंद व्यक्त करत ट्रॉफीसोबत अनेक फोटो काढले. मात्र दुसऱ्याच दिवशी लगेच कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) एका खास जागी जाऊन ट्रॉफीसोबत फोटो काढले.
केनने ट्रॉफीसोबत इंग्लंडमधील हॅमबल्डन क्लबमध्ये (Hambledon Club) जाऊन फोटोशूट केलं. हॅमबल्डन क्लब हा जगातील सर्वांत जुन्या क्लब्सपैकी एक असून अगदी 18 व्या शतकाच्या सुरुवातीस याठिकाणीच प्रथम क्रिकेट सामने खेळवले जात होते. त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये या जागेला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे केनने याठिकाणी जात फोटोशूट केलं.
केनने हॅमबल्डन क्लबमध्ये काढलेले फोटो आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
अंतिम सामन्यात केनने पहिल्या डावांत एकहाती झुंज दिल्यामुळेच न्यूझीलंडचा सामन्यात निभाव लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही केनने रॉस टेलरसोबत विजयी भागिदारी केली ज्यामुळे न्यूझीलंड सामना जिंकू शकला. केनने पहिल्या डावांत 49 आणि दुसऱ्या डावांत नाबाद 52 धावा केल्या.