घटस्फोटाची जोरदार चर्चा… ऐश्वर्याकडून आतापर्यंत बच्चन कुटुंबासोबतचे केवळ 8 फोटो शेअर; शेवटचा फोटो कधीचा?
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. बच्चन कुटुंबात सर्व काही अलबेल नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. या प्रकरणावर बच्चन किंवा राय कुटुंबातील कोणत्याही सदस्याने काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळेही ही चर्चा अधिकच वाढली आहे. त्यातच 2021 नंतर ऐश्वर्याने इन्स्टावर अनेक पोस्ट केल्या. पण बच्चन कुटुंबीयांसोबतचा एकही फोटो शेअर केला नाही. त्यामुळेही बच्चन कुटुंबात सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे.