Ajay Devgan : बॉलिवूडची ती हिरॉइन जी अजय देवगणची सूनही बनली आणि प्रेयसी सुद्धा, मग अचानक गायब
बॉलिवूडमध्ये अशी एक हिरॉइन आहे, जी चित्रपटात अजय देवगणची सूनही झाली आणि प्रेयसी सुद्धा. तुम्हाला या अभिनेत्रीबद्दल माहित आहे का? कोण आहे ही अभिनेत्री?
-
-
अजय देवगण मागच्या 30 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. या काळात त्याने शेकडो चित्रपटात अनेक अभिनेते-अभिनेत्रींसोबत काम केलं.
-
-
तुम्हाला माहितीय का? बॉलिवूडमध्ये अशी सुद्धा एक अभिनेत्री आहे, जी अजय देवगणची प्रेयसी सुद्धा बनली आणि नंतर अजयने तिच्या सासऱ्याचा सुद्धा रोल केला.
-
-
या अभिनेत्रीच नाव आहे, आयशा टाकिया. आयशा टाकियाने वर्ष 2004 मध्ये ‘टार्जन : द वंडर कार’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ‘टार्जन : द वंडर कार’ मध्ये आयशाच्या अपोजिट वत्सल सेठ होता. चित्रपटात अजय देवगण वत्सल सेठचा पिता बनलेला. म्हणजे आयशा टाकिया अजय देवगणची सून होती.
-
-
तेच ‘टार्जन : द वंडर कार’ नंतर 4 वर्षांनी 2008 साली आयशाने ‘संडे’ चित्रपटात काम केलं. या चित्रपटात अजय देवगण आयशा सोबत रोमान्स करताना दिसलेला.
-
-
संडे एक विनोदी चित्रपट होता. यात अजय, आयशाशिवाय अर्शद वारसी, इरफान खान आणि अली असगर सारखे कलाकार होते.
-
-
आयशा टाकियाने आपल्या करिअरमध्ये अक्षय कुमार, शाहिद कपूर आणि सलमान खान सारख्या स्टार्ससोबत काम केलय. 2010 मध्ये पाठशाला चित्रपट केला. त्यानंतर ती मोड चित्रपटात दिसली. नंतर अचानक तिने इंडस्ट्री सोडली.