Marathi News Photo gallery Ajinkya rahane cheteshwar pujara form worry for team india shreyas iyer suryakumar yadav hanuma vihari priyank panchal waiting
IND vs SA: रहाणे-पुजारा फेल होऊनही चान्स वर चान्स, यामध्ये ‘हे’ चार खेळाडू न खेळताच होतायत म्हातारे
केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्याडावात फेल गेल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. 'पुराने' हा हॅशटॅग ट्रेंड होत होता.
1 / 5
केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्याडावात फेल गेल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. 'पुराने' हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. रहाणेने चालू दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 22.66 च्या सरासरीने फक्त 136 धावा केल्या. पुजाराने 20.66 च्या सरासरीने 124 धावा केल्या. भारतीय क्रिकेटमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर इतकी संधी कोणाला मिळालेली नाही. या दोघांमुळे काही प्रतिभावान युवा खेळाडू बेंचवर बसले आहेत आणि त्यांच्या हातातून वेळ आणि संधी दोन्ही निसटत चाललीय.
2 / 5
श्रेयस अय्यर- मुंबईहून येणाऱ्या या खेळाडूने काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत डेब्यु केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना त्याने शतक आणि अर्धशतकी खेळी केली होती. आता अय्यर कसोटी संघात आहे. पण त्यांना संधी मिळालेली नाही. अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. अय्यरने 56 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 52.10 च्या सरासरीने 4794 धावा केल्यात. यात 13 शतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट 80 चा आहे. म्हणजेच तो वेगाने धावा बनवू शकतो. श्रेयस आता 27 वर्षांचा आहे. म्हणजे त्याला लवकरात लवकर संधी मिळाली पाहिजे.
3 / 5
सूर्यकुमार यादव - हा सुद्धा मुंबईकर खेळाडू आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याचे सुद्धा जबरदस्त आकडे आहेत. सूर्यकुमार यादवने 77 सामन्यात 44.01 च्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. यात 14 शतकांचा समावेश आहे. तो 62.68 च्या सरासरीने धावा बनवतो. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये असून सूर्यकुमार 31 वर्षांचा आहे. वेळीच त्याला संधी दिली नाही, तर आपण युवा प्रतिभा वाया घालवू.
4 / 5
हुनमा विहारी - हैदराबादमधून येणाऱ्या या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. एखाद्या खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याचा समावेश केला जातो. पण तो खेळाडू परतल्यानंतर विहारीला पुन्हा संघाबाहेर केले जाते. विहारीने 13 कसोटी सामन्यात 34.20 च्या सरासरीने 684 धावा केल्या आहेत. भारतात विहारी फक्त एक कसोटी सामना खेळलाय. म्हणजेच परदेशात अवघड विकेटसवर त्याने आपली प्रतिभा दाखवली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आकडेच त्याच्या प्रतिभेची चुणूक दाखवून देतात. हनुमा विहारीने 98 प्रथम श्रेणी सामन्यात 55.50 च्या सरासरीने 7548 धावा केल्या आहेत. यात 21 शतकांचा समावेश आहे.
5 / 5
प्रियांक पांचाळ: गुजरातमधून येणाऱ्या प्रियांकने प्रथमश्रेणीचे 100 सामने खेळले आहेत. पण अजून एकाही कसोटी सामन्यात संधी मिळालेली नाही. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये प्रियांक पांचाळने 45.52 च्या सरासरीने 7011 धावा केल्या आहेत. यात 24 शतकांचा समावेश आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या कसोटी मालिकेत प्रियांक पांचाळ संघाचा भाग आहे. पण त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. प्रियांक आता 31 वर्षांचा असून त्याला संधी मिळाली नाही, तर युवा प्रतिभा वाया जाईल.