अजिंक्य रहाणे मागच्या बऱ्याच महिन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करतोय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संधी मिळूनही त्याला प्रभाव पाडता आला नाही. आता आयपीएलमध्येही तोच संघर्ष कायम आहे. अजिंक्य रहाणेला आणखी एक धक्का बसलाय. त्य़ाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडाव लागलय.
अजिंक्य रहाणेला झालेली दुखापत गंभीर आहे. जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत संधी मिळाली, तरी तो जाऊ शकणार नाही. अजिंक्य रहाणेच्या जागी कसोटी संघात हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला होता. दुखापतीमुळे पुढचा मार्ग अजूनच खडतर झालाय.
अजिंक्य रहाणे कोलकाता नाइट रायडर्सच्या बायो बबलमधून बाहेर पडणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याात त्याला दुखापत झाली होती. फिल्डिंग करताना तो दिसला नव्हता. अजिंक्यला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवलं जाईल. तिथे तो चार आठवडे राहील.
अजिंक्य रहाणेला KKR ने त्याच्या बेस प्राइसला म्हणजे 1 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 7 सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली. पण त्याने 19 च्या सरासरीने फक्त 133 धावा केल्या.
अजिंक्य रहाणेच्या बरोबरीने संघाबाहेर गेलेल्या चेतेश्वर पुजाराला इंग्लंड विरुद्धच्या एका कसोटी सामन्यासाठी संघात संधी मिळू शकते. पुजारा सध्या इंग्लंडमध्येच आहे. तो ससेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळतोय. तिथे त्याने द्विशतक झळकावलं आहे.