Ajit Pawar : अजित पवार यांनी केला मेट्रोने प्रवास, प्रवाश्यांनी काय केली मागणी
Pune Metro : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुणे मेट्रोतून प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांशी संवाद साधला. सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करावी लागणार असल्याचे सांगितले.
1 / 6
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोन प्रवास केला. चांदणी चौक उद्घाटन सोहळ्याला जाताना अजित पवार मेट्रोने गेले. रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशन ते वनाज मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास त्यांनी केला.
2 / 6
अजित पवार यांनी प्रवास करताना अनेक जणांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कॅबिनमध्ये बसून अधिकाऱ्यांकडून माहिती घेणे आणि प्रत्यक्षात प्रवास करणाऱ्यांकडून माहिती घेणे यामध्ये फरक असल्याचे त्यांनी सांगितले.
3 / 6
फिल्डवर गेल्यावर खऱ्या समस्या कळतात. आता आयटीमधील तरुणांशी चर्चा झाली. ते म्हणाले की, आम्ही पूर्वी कारने प्रवास करत होतो. परंतु मेट्रोची सुविधा मिळाल्यामुळे कारचा वापर करत नाही, असे त्या तरुणांनी अजित पवार यांना सांगितले.
4 / 6
कोणत्याही शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली झाल्याशिवाय वाहतूक कोंडीची प्रश्न सुटणार नाही, यामुळे पुणे शहरात मेट्रोसह इतर पर्याय दिले जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
5 / 6
पुणे मेट्रो सकाळी सहा वाजेपासून सुरु करा, अशी मागणी अनेकांनी केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यांच्या या मागणीवर आता विचार केला जाईल.
6 / 6
मेट्रोमध्ये पुणे शहरातील स्थानिक मुले, मुलींना नोकरी देण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात ठेकेदारला सूचना करण्यात येणार आहे. नाहीतर त्याच्या करार पुढे वाढवण्यात येणार नाही.