कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते.
कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. ‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो.
Follow us on
कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. ‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो.
कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे.
कोरफडीच्या औषधी गुणांमुळे खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडचा वापर केला जातो.
कोरफडीत मुबलक प्रमाणात ‘ई’ जीवनसत्व आढळते. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती औषध ठरते.
कोरफडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्वचा कोरडी पडते अशावेळी कोरफड जेलचा वापर मॉइश्चरायजरसारखा करू शकता.