लग्नाच्या दोन महिन्यांत अजय देवगणची ‘हिरोइन’ गरोदर; मुलाला दिला जन्म
अजय देवगणच्या 'भोला' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री आमला पॉलने नुकताच मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर तिने बाळासोबतचा व्हिडीओ पोस्ट करत त्याचं नाव जाहीर केलं आहे. आमलाने लग्नाच्या दोन महिन्यांतच गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं.
1 / 5
आमला पॉल ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये तिने जगत देसाईशी लग्न केलं. लग्नाच्या दोन महिन्यांतच तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. आता आमलाने मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर बाळाच्या स्वागताचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
2 / 5
आमलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये घरात तिचं आणि बाळाचं स्वागत होत असल्याचं पहायला मिळतंय. घराला फुग्यांनी सजवण्यात आलं असून आमला तिच्या कुशीत बाळाला घेऊन प्रवेश करताना दिसतेय.
3 / 5
आमला आणि जगतने त्यांच्या मुलाचं नाव 'इलई' असं ठेवलं आहे. 11 जून रोजी इलईचा जन्म झाला. मुलाच्या जन्मानंतर आमला आणि जगतवर चाहत्यांकडून तसंच कलाविश्वातील मित्रमैत्रिणींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
4 / 5
आमलाचं जगतशी हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने दिग्दर्शक ए. एल. विजयशी लग्न केलं होतं. मात्र 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आमलाने गेल्या वर्षी जगतशी लग्नगाठ बांधली. नोव्हेंबरमधील लग्नानंतर दोन महिन्यांतच जानेवारी 2024 मध्ये तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं.
5 / 5
आमलाने मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. गेल्या वर्षी तिने अजय देवगणच्या 'भोला' या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती दिग्दर्शक ए. एल. विजयच्या प्रेमात पडली.