पुण्यातील सर्वात उंच पाच इमारती कोणत्या? सर्वात उंच इमारत किती मजली आहे?

| Updated on: Sep 19, 2024 | 3:32 PM

Pune City: पुणे शहर हे देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे. राज्यातील मुंबईनंतर पुणे सर्वात मोठे महानगर आहे. पुणे शहराचा औद्योगिक विकास चौफेर झाला आहे. त्यानंतर पुणे आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र झाले आहे. पुणे शहरात अनेक उंच इमारती आहे. परंतु पाच सर्वात उंच इमारती कोणत्या?

1 / 5
हडपसरमधील अमानोरा फ्यूचर टॉवर्स पुण्यातील पाचव्या क्रमांकाची उंच इमारात आहे. 115 मीटर म्हणजे 377 फूट उंच एक टॉवर या ठिकाणी आहे. 2014 मध्ये तयार झालेल्या या इमारतीमध्ये 31 मजले आहेत.

2 / 5
पुण्यातील चौथ्या क्रमांकाचे उंच टॉवर न्याती आयरीस आहे. खराडी भागात हे टॉवर आहे. 117 मीटर उंच म्हणजे 384 फूटांचे हे टॉवर आहे. या ठिकाणी 32 मजले असून एकूच चार टॉवर आहे. 2021 मध्ये ही इमारत पूर्ण झाली.

3 / 5
पुण्यातील तिसऱ्या क्रमांकाची उंच इमारात ब्लू रिज आहे. आयटी कंपन्यांचे हब असलेल्या हिंजवडी भागात ही इमारत आहे. 32 मजली 118 मीटर उंच (387 फूट) चार टॉवर या ठिकाणी आहे. 2014 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली होती.

4 / 5
हडपसरमधील अमानोरा ॲड्रेनो टॉवर्स हे पुण्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच टॉवर आहे. 119 मीटर म्हणजे 390 फूट उंच ही इमारत आहे. या ठिकाणी 35 मजले असून 5 टॉवर उभारण्यात आले आहे. 2022 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे.

5 / 5
पुण्यातील सर्वात उंच इमारत हडपसर परिसरातच आहे. अमानोरा गेटवे टॉवर्स असे या इमारतीचे नाव आहे. 165 मीटर उंच (541 फूट) असलेल्या या इमारतीत 45 मजले आहेत. या ठिकाणी टॉवर्सची संख्या 2 आहे. 2021 मध्ये बांधून ही इमारत पूर्ण झाली.