Marathi News Photo gallery America has more weapons than population; Find out in detail the amount of arms purchases in the last five years
America: अमेरिकेत लोकसंख्येपेक्षा शस्त्रसंख्या ज्यादा ; गत पाच वर्षात शस्त्र खरेदीचे प्रमाण किती, जाणून घ्या सविस्तर
CDC च्या अहवालानुसार, अमेरिकेत दररोज 53 लोकांना गोळ्या घालून ठार केले जाते. याच अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, अमेरिकेतील हत्यांमध्ये 79 टक्के लोक गोळ्या घालून मारण्यात आले आहेत.
1 / 9
अमेरिकेतील ट्रेक्सास शहरातील शाळेत करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबारच्या घटनेने देश पुन्हा एकदा हादरून गेला आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील शस्त्र परवान्याचा तसेच शस्त्र खरेदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
2 / 9
एका अहवालानुसार,अमेरिकेत गेल्या पाच वर्षांच्या काळात शाळेत घडलेल्या गोळीबाराच्या घटना 100 हून आहेत.याबरोबरच इतर सार्वजनिक ठिकाणी
घडलेल्या गोळीबाराच्या घटना 200 हून अधिक आहेत.
3 / 9
अमेरिकेत प्रत्येक 100 नागरिकांमागे 120 शस्त्रे आहेत. त्यामुळेच आता येथे अशा घटना सर्रास घडल्या जात आहेत. अमेरिकेत कायदेशीररित्या बंदूक किंवा शस्त्र बाळगण्याचाअधिकार राज्यघटनेच्या दुसऱ्या दुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
4 / 9
या राज्य घटनेच्या दुरुस्तीमध्ये बंदूक नियंत्रण कायदा 1968 (GCA) नुसार रायफल किंवा कोणतीही छोटी शस्त्रे खरेदी करण्यासाठी त्या व्यक्तीने वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. हँडगनसारखी इतर शस्त्रे खरेदी करण्यासाठी व्यक्तीने वय 21 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
5 / 9
Centers for Disease Control and Prevention (सीडीसीच्या) अहवालानुसार, 2019 मध्ये यूएसमध्ये एकूण 38 हजार 355 लोकांचा बंदुकीच्या गोळ्या लागून मृत्यू झाला आहे. त्यापैकी 23 हजार 941जणांनी आत्महत्या केल्या, तर 14 हजार 414 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अपघात आणि मारामारी दरम्यान झालेल्या गोळीबारात 1,352 लोक मारले गेले आहेत.
6 / 9
अहवालानुसार, अमेरिकेच्य 33 कोटी लोकसंख्येच्या देशातील नागरिकांकडे जवळपास 39 कोटी शस्त्रे आहेत. अमेरिकेत 2020 मध्ये गोळीबारात हत्या होण्याच्या घटनांमध्ये 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर एकूण 19 हजार 384 जणांची हत्या झाली.
7 / 9
CDC च्या अहवालानुसार, अमेरिकेत दररोज 53 लोकांना गोळ्या घालून ठार केले जाते. याच अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, अमेरिकेतील हत्यांमध्ये 79 टक्के लोक गोळ्या घालून मारण्यात आले आहेत.
8 / 9
अलीकडील अहवालानुसार, जानेवारी 2019 ते एप्रिल 2021 दरम्यान अमेरिकेतील 7 दशलक्षाहून अधिक लोकांनी बंदुका खरेदी केल्या आहेत. नव्याने बंदुकींची खरेदी करणाऱ्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक महिला आहेत. त्याचबरोबर 40 टक्के कृष्णवर्णीय नागरिकांचा समावेश आहे.
9 / 9
अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स 2021 च्या अहवालानुसार, कोरोना महामारी दरम्यानही बहुतेक लोक बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी झाले दिसून आले आहे. त्यातही मुलांचा समावेश अधिक आहे.