वडाळ्यातील सगळे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवू असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
महेश घोलप |
Updated on: Apr 18, 2023 | 9:58 AM
वडाळ्यातील सगळे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवू अशी ग्वाही देत त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना आश्वस्त केले. तसेच शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
1 / 5
मुंबई महानगरपालिकेतील वडाळा विभागातील माजी नगरसेवक, सार्वजनिक आरोग्य समितीचे माजी अध्यक्ष आणि युवासेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
2 / 5
अमेय घोले यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असताना अनेक महत्वाची पदे भूषवली असून गेल्या काही दिवसात मनाप्रमाणे काम करण्यात आडकाठी होत असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. वडाळा परिसरातील अनेक पुनर्विकास प्रकल्प २० ते २५ वर्षांपासून अपूर्ण असून ते पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
3 / 5
वडाळ्यातील सगळे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवू अशी ग्वाही देत त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना आश्वस्त केले. तसेच #शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
4 / 5
याप्रसंगी त्यांच्यासह माजी उपविभाग समन्वयक चित्रा पाटील, उपविभाग समन्वयक सविता देशमुख, स्मिता सावंत, निकिता दळवी, पराग थेवई, उप शाखाप्रमुख नरेंद्र रोकडे, रवी मोडसिंह, रोहित सोनवणे, प्रकाश गुरव, राहुल शिंदे, युवासेना उपविभाग प्रमुख अमेय रावणक, रोहित खेडेकर, सुरेश जाधव उपशाखाप्रमुख उमेश माळी, रमेश थोरात, प्रफुल्ल घाडगे, सागर पवार, कुणाल शेडगे, रोशन शेलार आशा जवळपास २०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
5 / 5
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार संजय शिरसाट, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.