Marathi News Photo gallery Amid sepration speculation from Natasa Stankovic How many properties does Hardik Pandya own Or does he live on rent Heres what we know
Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या मालकीची किती प्रॉपर्टी? कुठे भाड्यावर फ्लॅट घेतलेत? महत्त्वाची माहिती समोर
Hardik Pandya-Natasa Stankovic : हार्दिक पांड्या सध्या नताशा स्टेनकोविक सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक आणि नताशा विभक्त होऊ शकतात अशी चर्चा आहे. घटस्फोट घेतल्यास हार्दिकला त्याच्या 70 टक्के प्रॉपर्टीवर पाणी सोडाव लागेल अशी अफवा आहे. आता हार्दिकच्या मुंबई-गुजरातमधील प्रॉपर्टी संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
1 / 10
टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहेत. त्याला कारण आहे नताशा स्टेनकोविक. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविकमध्ये सध्या दुरावा वाढला आहे. लवकरच दोघे विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. असं झाल्यास हार्दिकला नताशाला संपत्तीमधील 70 टक्के वाटा द्यावा लागणार अशी सुद्धा अफवा पसरली आहे.
2 / 10
हार्दिक पांड्याने क्रिकेट आणि आयपीएलमधून प्रचंड पैसा कमावला आहे. त्याने व्यवसायात सुद्धा गुंतवणूक केली आहे. हार्दिक पांड्याच्या संपत्ती संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्याच्या मालकीची कुठे संपत्ती आहे? मुंबईत त्याने कुठे भाड्यावर फ्लॅट घेतलेत या बाबत माहिती मिळालीय.
3 / 10
हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ क्रुणाल पांड्या या दोघांनी मिळून मुंबईच्या लोअर परेल भागात तीन जोडी अपार्टमेन्ट भाड्यावर घेतलं आहे. दर महिन्याला या अपार्टमेन्टच्या भाड्यापोटी त्यांना 7.5 लाख रुपये द्यावे लागतात. झॅपकीने मिळवलेल्या कागदपत्रातून ही माहिती समोर आलीय.
4 / 10
जोडी अपार्टमेन्ट म्हणजे दोन रहिवाशी फ्लॅटचा मिळून एक सिंगल फ्लॅट बनतो. एन्पार लोट्स ग्रुपच्या लोट्स एन्पार रेसिडन्सीमध्ये हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्याने हे फ्लॅट भाड्यावर घेतले आहेत. 28 व्या मजल्यावर हे फ्लॅट असून महिन्याच भाड 2.5 लाख रुपये आहे. ऑगस्ट 2021 मध्ये भाडेतत्त्वावर घेण्यासाठी नोंदणी झाली आहे.
5 / 10
कागदपत्रांनुसार टू स्टॅक कार पार्किंग, टेरेस गार्डन असलेला हा फ्लॅट असून पाचवर्षांसाठी हा भाडेकरार केला आहे. पहिल्या तीन वर्षांसाठी प्रति महिना 2.5 लाख रुपये आणि नंतरच्या दोन वर्षांसाठी 2.87 लाख रुपचे प्रति महिना भाड्यापोटी द्यावे लागतील.
6 / 10
अपार्टमेन्टसाठी रहिवाशी असलेल्या हार्दिक आणि क्रुणालने डिपॉझिटपोटी 7.5 लाख रुपये भरले आहेत. लोट्स एन्पार रेसिडन्सीमध्येच 30 व्या मजल्यावरच हार्दिक-क्रृणालने दुसरी जोडी अपार्टमेन्ट भाड्यावर घेतली आहे.
7 / 10
त्या फ्लॅटसाठी सुद्धा ऑगस्ट 2021 मध्येच पाच वर्षांसाठी भाडेपट्टीचा करार करण्यात आला आहे. तिथे सुद्धा भाडेपट्टी तशीच आहे. पहिल्या तीन वर्षांसाठी प्रति महिना 2.5 लाख रुपये आणि नंतरच्या दोन वर्षांसाठी 2.87 लाख रुपये प्रति महिना भाड्यापोटी द्यावे लागतील.
8 / 10
लोट्स एन्पार रेसिडन्सीच्या 30 व्या मजल्यावरच हार्दिक-क्रुणाल पांड्या बंधुंनी आणखी एक जोडी अपार्टमेन्ट भाड्यावर घेतलय. त्यासाठी सुद्धा पहिली तीन वर्ष 2.5 लाख रुपये आणि नंतरच्या नंतरच्या दोन वर्षांसाठी 2.87 लाख रुपये भाड्याचा फॉर्मेट आहे. म्हणजे एकाच इमारतीत त्याने तीन जोडी अपार्टमेन्ट घेतले आहेत.
9 / 10
लोट्स एन्पार रेसिडन्सीमध्ये 960 चौरस मीटरचे 2 BHK आणि 1500 चौरस मीटरचे 3 BHK फ्लॅट आहेत. 2 BHK फ्लॅटची किंमत 6.5 करोड ते 8 कोटी आहे आणि 3 BHK फ्लॅटची किंमत 9 ते 10 कोटी रुपये आहे. स्थानिक ब्रोकरच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलय.
10 / 10
रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याच गुजरातच्या वडोदरामध्ये पेन्टहाऊस आहे. 6000 चौरस मीटरमध्ये हे पेन्टहाऊस पसरलेलं आहे.