तृणमूल काँग्रेसचे 10 आमदार आणि काँग्रेसचा, सीपीआयचा (एम) प्रत्येकी एक आमदार भाजपात गेले आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 1998 तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तृणमूल काँग्रेसची गेल्या 23 वर्षात जितकी हानी झाली नव्हती तितकी हानी यावर्षी भाजपने केली आहे. विशेष म्हणजे भाजपाच पक्षप्रवेश केलेल्या एकाही नेत्याने विधानसभेचं सदस्यत्व सोडलेलं नाही.