बिग बींनी दाखवली घरातील मंदिराची झलक; शिवलिंगावर जलाभिषेक करत देवासमोर झाले नतमस्तक

| Updated on: Jun 17, 2024 | 10:45 AM

अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या ब्लॉगमध्ये विविध अनुभव लिहित असतात. रविवारी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी मुंबईतील त्यांच्या 'जलसा' या बंगल्याच्या बागेत असलेल्या मंदिराची झलक दाखवली. यामध्ये ते देवपूजा करताना दिसले.

1 / 5
बॉलिवूड महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. चाहत्यांसोबत ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. बिग बींनी आजवर अनेकदा फोटोंच्या माध्यमातून त्यांच्या 'जलसा' या घरातील भव्य मंदिराची झलक दाखवली आहे.

2 / 5
रविवारी अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा जलसाच्या बागेत असलेल्या मंदिराची झलक नेटकऱ्यांना दाखवली. बिग बींनी रविवारी संध्याकाळी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये मुंबईतील 'जलसा' या बंगल्यातील बागेत बनवलेल्या मंदिराचे फोटो शेअर केले. या मंदिरात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्तींसह एक शिवलिंगसुद्धा पहायला मिळतंय.

3 / 5
बिग बींच्या बंगल्याच्या आत असलेल्या बागेत हे सुंदर संगमरवरचं मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिरात स्थापित केलेल्या शिवलिंगावर ते जलाभिषेक करताना दिसत आहेत. या मंदिराच्या आजूबाजूला छोटी-मोठी झाडं लावण्यात आली आहेत. आणखी एका फोटोमध्ये बिग बी देवासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत.

4 / 5
हे फोटो पाहून बिग बींच्या घरातील वातावरण किती प्रसन्न असेल, याचा अंदाज लावू शकतो. याआधीही त्यांनी विविध फोटोंच्या माध्यमातून घराच्या आतील झलक दाखवली होती.

5 / 5
बिग बी लवकरच 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत प्रभास, कमल हासन, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.