PHOTO : घनदाट, मजबूत केस आणि निरोगी त्वचा कशी होईल?; आवळ्याचा वापर करा, समस्या चुटकीत सोडवा
आवळा आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळा नैसर्गिक मार्गाने चेहऱ्यावरील मुरुमाचे डाग दूर करण्यासाठी मदत करते. आवळाचा रस आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
1 / 5
आवळा आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळा नैसर्गिक मार्गाने चेहऱ्यावरील मुरुमाचे डाग दूर करण्यासाठी मदत करते. आवळाचा रस आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आवळाचा रस आपण सतत आठ दिवस लावला तर आपल्या चेहऱ्यावरील मुरुमाचे डाग दूर होतील.
2 / 5
आवळ्यामधील अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. एक चमचा आवळा पावडर घ्या आणि गरम पाण्यात मिसळा. चेहरा स्क्रब करण्यासाठी या पेस्टचा वापर करा, पाच मिनिटांनंतर चेहरा धुवा. आपणास हवे असल्यास आपण पेस्टमध्ये थोडी हळद देखील घालू शकता.
3 / 5
केस गळती कमी करण्यासाठी आवळा अत्यंत प्रभावी आहे. यासाठी चार ते पाच आवळे पाण्यात मिक्स करा आणि उकळून द्या. आवळे उकडल्यानंतर मॅश करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाळू तसेच केसांवर लावा. आपण आठवड्यातून एकदा हे करू शकता. यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते.
4 / 5
या घरगुती कंडीशनरमुळे आपले केस मुलायमदार आणि सुंदर दिसतील. (टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
5 / 5
आपले केस कमी वयात पांढरे होत असतील तर आपण आवळ्याचे तेल केसांना लावू शकतो. यामुळे केस पांढरे होणार नाहीत. आवळ्याचे तेल केसांना लावल्यामुळे केस मजबूत आणि चमकदार बनतात. आवळ्याचे तेल घरी तयार करण्यासाठी आपल्याला गुलाबपूड, आवळा आणि खोबऱ्याचे तेल लागणार आहे. सर्वात अगोदर आवळे बारीक करून घ्या आणि त्यामध्ये गुलाबपूड आणि खोबरेल तेल मिक्स करा आणि केसांना लावा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)