सैफला घटस्फोट दिल्याच्या 20 वर्षांनंतर अमृता सिंह करणार दुसरं लग्न? म्हणाली..
सैफ अली खानला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री अमृता सिंहनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. 1991 मध्ये सैफ आणि अमृताने लग्न केलं. या दोघांच्या वयात बरंच अंतर आहे. त्यामुळे या जोडीने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. लग्नाच्या 12 वर्षांनंतर सैफ आणि अमृताने एकमेकांना घटस्फोट दिला.
1 / 6
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या घटस्फोटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1991 मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांनी 2004 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर या वीस वर्षांत सैफ आणि अमृता कधीच एकत्र दिसले नाहीत. पण सारा आणि इब्राहिम या मुलांसोबत सैफचं नेहमी भेटणं-बोलणं सुरू असतं.
2 / 6
एका मुलाखतीत अमृताने घटस्फोटाच्या इतक्या वर्षांनंतर दुसऱ्या लग्नाविषयी आपलं मत मांडलं. ती पुन्हा लग्न करणार का, भविष्यातील तिचा प्लॅन काय आहे, याविषयी तिला विचारण्यात आलं होतं. पूजा बेदीला दिलेल्या या मुलाखतीत अमृताने दुसऱ्या लग्नाविषयी मोकळं मत मांडलं.
3 / 6
ती म्हणाली, "मला पुढे जाऊन लग्न करायचं नाहीये पण पुढे काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. हो माहीत नाही किंवा कदाचित नाही असं उत्तर द्यायला मी काही आता 16 वर्षांची तर नाही. त्यामुळे खरं सांगायचं झालं तर मला नाही वाटत."
4 / 6
"तुम्ही तुमच्या भविष्याविषयी काही सांगू शकत नाही. खरंतर माझ्याकडे ते सर्वकाही आहे, जो एक पुरूष मला देऊ शकतो. काही गोष्टी सोडलं तर त्यासाठी मला लग्न करण्याची काही गरज नाही", अशा शब्दांत अमृता व्यक्त झाली.
5 / 6
यानंतर जेव्हा पूजाने अमृताला विचारलं की जर तू पुन्हा लग्न केलंस, तर पुन्हा तुझं करिअर सोडशील का? कारण सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर अमृताने फिल्म इंडस्ट्री सोडली होती. त्यावर उत्तर देताना अमृताने सांगितलं, "नाही, यासाठी कदाचित मी लग्न करणार नाही."
6 / 6
"मला या गोष्टीची जाणीव राहावी की माझ्याजवळ असं कोणी नाही जो माझे बिल्स भरू शकेल. मला काम करत राहावं लागेल, यासाठी मी लग्न करणार नाही", असं तिने स्पष्ट केलं. सैफला घटस्फोट दिल्यानंतर अमृता पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय झाली होती.