3 वाजता वरात, 8 वाजता वरमाळा.. अनंत-राधिकाच्या लग्नाचं संपूर्ण शेड्युल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही लग्नसोहला मुंबईतील बीकेसीमधील जियो कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहे. या लग्नाचं संपूर्ण वेळापत्रक कसं असेल त्याची माहिती समोर आली आहे.
1 / 5
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी आज (शुक्रवार) बिझनेसमन वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. या वर्षातील हे सर्वांत मोठं लग्न आहे. बॉलिवूड, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील नामांकित सेलिब्रिटी या शाही लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाचं संपूर्ण शेड्युल समोर आलं आहे.
2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजल्यापासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. तर वरमाळाची विधी रात्री 8 वाजता संपन्न होईल. त्यानंतर अनंत आणि राधिका रात्री 9.30 वाजता सप्तपदी घेतील. गेल्या काही महिन्यांपासून अनंत-राधिकाच्या लग्नाचा जल्लोष सुरू आहे.
3 / 5
फेब्रुवारी महिन्यात जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. हा संपूर्ण कार्यक्रम तीन दिवसांचा होता. त्यानंतर जून महिन्यात क्रूझवर आलिशान पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता लग्नापूर्वी 3 जुलैपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली होती.
4 / 5
मामेरू, संगीत, हळद, मेहंदी, शिव-शक्तीची पूजा असे विविध कार्यक्रम गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहेत. या सर्व कार्यक्रमांना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, सलमान खान, दीपिका पादुकोण हे सर्व सेलिब्रिटी कार्यक्रमांना उपस्थित होते.
5 / 5
मुंबईत बीकेसीमधील जियो कन्वेंशन सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नानंतर रिसेप्शन आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. हा संपूर्ण समारोह पुढील तीन दिवसांपर्यंत सुरू असेल.