पूर्व पत्नीच्या ट्रोलिंगनंतर पवन कल्याणचं खासगी आयुष्य चर्चेत; केले तीन लग्न
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचं खासगी आयुष्य चर्चेत आलं आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांची पूर्व पत्नी रेणु देसाईला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याविरोधात पोस्ट लिहिल्यानंतर पवन कल्याणचं खासगी आयुष्य प्रकाशझोतात आलं आहे.
1 / 6
जनसेना पार्टीचे संस्थापक, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं. यानंतर पवन कल्याण यांच्या पूर्व पत्नीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
2 / 6
ट्रोलिंगला वैतागून अखेर पवन कल्याणची पूर्व पत्नी रेणुका देसाई उर्फ रेणु देसाई यांनी सडेतोड उत्तर दिलं. "तेच मला सोडून गेले आणि दुसरं लग्न", असं तिने म्हटलंय. मात्र काही वेळानंतर रेणुने ही कमेंट डिलिट केली. तरी त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3 / 6
रेणु देसाई आणि पवन कल्याण यांनी 2009 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर 2012 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना अकिरा हा मुलगा आणि आध्या नावाची मुलगी आहे. मुलगा अकिरा हा त्याच्या वडिलांच्या राजकीय प्रवासात त्यांना सक्रियपणे पाठिंबा देतोय. तर अलीकडेच आध्या ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या वडिलांच्या भेटीत सहभागी झाली होती.
4 / 6
पवन कल्याण यांनी 1997 मध्ये नंदिनीशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांतच ते सहअभिनेत्री रेणु देसाईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. जून 2007 मध्ये नंदिनीने अखेर पवन कल्याण यांच्याविरोधात खटला दाखल केला. घटस्फोट न देताच त्यांनी दुसरं लग्न केल्याचा आरोप तिने केला होता.
5 / 6
पवन कल्याण यांनी रेणु देसाई यांच्यासोबतच्या लग्नाचा आरोप फेटाळला होता. त्यानंतर पुढच्याच महिन्यात त्यांनी नंदिनीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. ऑगस्ट 2008 मध्ये पवन कल्याण आणि नंदिनी विभक्त झाले. त्यावेळी त्यांनी नंदिनीला पाच कोटी रुपये पोटगी दिली होती.
6 / 6
रेणु देसाई यांच्यासोबत आठ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये लग्न केलं. मात्र 2012 मध्ये ते विभक्त झाले. 2011 मध्ये 'तीन मार' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पवन कल्याण यांची भेट रशिनय मॉडेल अॅना लेझनेवाशी झाली होती. त्यानंतर त्यांनी सप्टेंबर 2013 मध्ये स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत लग्न केलं. पवन आणि अॅना यांना पोलेना ही मुलगी आणि मार्क हा मुलगा आहे.