अभिनेत्री करिना कपूर खानने बॉलिवूडमध्ये स्वत: चे खास स्थान निर्माण केले आहे. करिनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मात्र, हे खरं आहे की, आजही इंडस्ट्रीमध्ये अभिनेता आणि अभिनेत्रींच्या फी बद्दल बोलले जाते.
करिनाने तिच्या मनाप्रमाणे काम केले आहे आणि तिला अपेक्षित फी ही मिळाली आहे. खुद्द अनिल कपूर यांनी याचा खुलासा केला आहे. अनिल कपूर यांनी सांगितले आहे की, करिनाने वीरे दी वेडिंगसाठी खूपच भारी फी घेतली होती
करीनाने त्याच्या चॅट शोमध्ये फी विषयावर भाष्य केले होते. त्यावर उत्तर अनिल कपूर यांनी दिले आहे. या विषयावर अनिल कपूर यांनी करिनाच्या फीचा उल्लेख केला.
अनिल कपूर विनोदाने म्हणाले की, तु माझ्याकडून बरीच मोठी रक्कम घेतली आहे. जेव्हा वीरे दी वेडिंगबद्दल बोलणे सुरू होते. तुझी फी ऐकूनच सुरूवातीली मला धक्का बसला होता. तू अभिनेत्यापेक्षाही जास्त पैसे घेतेस.
अनिलच्या या खुलासावर करीना जास्त बोलू शकली नाहीत. ती फक्त एवढंच म्हणाली की, आपण सर्वजण अनेक बंधने तुटण्याचा प्रयत्न करतो. परंतु असे काही लोक आहेत जे अजूनही असे भेदभाव करतात.
अनिलने हा खुलासा केला होता त्यावेळी ते आपल्या AK Vs AK च्या प्रमोशनसाठी आले होते. AK Vs AK मध्ये अनिल कपूरसोबत अनुराग कश्यपने उत्तम काम केले आहे.