24 व्या वर्षी आई बनायचं नाही म्हणून अभिनेत्रीने सोडली ‘अनुपमा’ मालिका

| Updated on: Dec 13, 2023 | 9:22 AM

‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली एका शांत स्वभावाच्या, समजुतदार गृहिणीची भूमिका साकारतेय. कोरोना काळात ही मालिका सुरू झाली. गेल्या वर्षभरापासून ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होती. मात्र आता स्टार प्लस वाहिनीवरील दुसऱ्या मालिकांकडून ‘अनुपमा’ला तगडी टक्कर मिळतेय.

1 / 5
'अनुपमा' या टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकेच्या कथेत बरेच नवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. या मालिकेत अनुपमाची मुलगी पाखीची भूमिका साकारून अभिनेत्री मुस्कान बामणेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती या मालिकेतून गायब आहे.

2 / 5
पाखी पुन्हा मालिकेत परतणार असल्याचा विश्वास जरी चाहत्यांना असला तरी आता तिच्या भूमिकेविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुस्कानने 'अनुपमा' या मालिकेला रामराम केला आहे. यामागचं कारणही समोर आलं आहे.

3 / 5
'टेलीचक्कर'ने दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानला मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये आईची भूमिका साकारायची आहे. मुस्कान 24 वर्षांची असून करिअरच्या सुरुवातीलाच अशा प्रकारची भूमिका साकारण्यास तिचा स्पष्ट नकार आहे.

4 / 5
गेल्या काही दिवसांपासून तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मालिकेतून ब्रेक घेऊन ती एका वेब सीरिजसाठी शूटिंग करत असल्याचं समजतंय. मुस्कानला 'अनुपमा' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकेच्या सुरुवातीपासून ती यात पाखीची भूमिका साकारतेय.

5 / 5
स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेच्या टीआरपीमध्ये सतत घट होताना दिसतेय. टीआरपीसाठी आता मालिकेत मोठा लीप येणार असल्याचंही कळतंय. या लीपनंतर मालिकेतील बऱ्याच भूमिका बदलणार आहेत.