Marathi News Photo gallery Anushka sharma gives birth to son akaay in london will her son get british citizenship how one can get uk nationality
Virats Baby | लंडनमध्ये विराट-अनुष्काच्या बाळाचा जन्म, UK ची नागरिकता मिळणार?
Virats Baby | लंडनमध्ये विराट-अनुष्काच्या बाळाचा जन्म झालाय. त्यामुळे त्याला त्या देशाची नागरिकता मिळणार काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या प्रश्नाच उत्तर जाणून घेऊया. यूकेचे नागरिकत्वासाठी काय नियम आहेत ते समजून घेऊया.
1 / 10
क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा माता-पिता बनले आहेत. अनुष्का शर्माने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला.
2 / 10
विराटने स्वत: इन्स्टाग्राम पोस्टमधून ही माहिती दिली. विराटने मुलाच नाव अकाय ठेवलय.
3 / 10
विराट आणि अनुष्काला पहिली मुलगी आहे. तिच नाव वामिका आहे. मुलाच्या जन्मानंतर विराट-अनुष्काला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छा मिळत आहेत. विराट-अनुष्काच्या दुसऱ्या अपत्याचा जन्म लंडनमध्ये झालाय.
4 / 10
विराट-अनुष्काच्या मुलाचा जन्म लंडनमध्ये झालाय. त्यामुळे अकायला ब्रिटनची नागरिकता मिळणार काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या प्रश्नाच उत्तर जाणून घेऊया.
5 / 10
यूनायटेड किंगडम म्हणजे यूकेची नागरिकता मिळवण्याची प्रक्रिया काय आहे?. अकायचा जन्म लंडनमध्ये झालाय.
6 / 10
सामन्यपणे कुठल्याही व्यक्तीचा जिथे जन्म होतो, तो त्या देशाचा नागरिक असतो. त्यामुळे जन्मलेल्या बाळाचे आई-वडिल किंवा दोघांपैकी एक संबंधित देशाचा नागरिक असला पाहिजे.
7 / 10
प्रत्येक देशात नागरिकत्वाबद्दल वेगवेगळे नियम आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली भारतीय नागरिक आहेत. केवळ चांगल्या वैद्यकीय सुविधांचा विचार करुन त्यांनी आपल्या बाळाच्या जन्मासाठी लंडनची निवड केली.
8 / 10
त्यामुळे अकायचा जन्म भले लंडनमध्ये झाला असेल, पण त्याला युनायटेड किंगडमची नागरिकता मिळणार नाही. एका देशाची महिला दुसऱ्या देशात जाऊन बाळाला जन्म देत असेल, तर अशीच थेट नागरिकता मिळणार नाही.
9 / 10
विराट-अनुष्काच्या बाबतीत सुद्धा हाच नियम लागू होतो. यूकेच नागरिकत्व हव असेल, तर तिथल्या नियमांच पालन कराव लागेल. आधी यूकेमध्ये पाच वर्ष वैध वीजावर राहिल्यानंतर कुठलीही व्यक्ती नागरिकत्वासाठी थेट अर्ज करु शकत होती. त्यासाठी इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञानाची परीक्षा द्यावी लागायची.
10 / 10
आता नियमात बदल झालाय. वैध वीजावर पाच वर्ष राहिल्यानंतरही लोकांना अस्थायी नागरिकत्व मिळतं. कायमस्वरुपी नागरिकत्वासाठी पॉइंट सिस्टिम फॉलो करावी लागेल. अस्थायी नागरिकत्व कायमस्वरुपी नागरिकत्वामध्ये बदलण्यासाठी एक ते पाच वर्षांचा वेळ लागू शकतो.